

पुढारी ऑनलाईन डेस्क
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे आज लग्न आहे. त्याआधी हळदी आणि मेहंदी सेरेमनीमध्ये रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. रिद्धिमाने साडी नेसून आणि नीतू कपूर यांनी लहंगा परिधान केलेला दिसला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना पोझ दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रिद्धिमाने पहिल्यांदाच आपल्या होणाऱ्या वहिनीचे कौतुक केले. लग्नाआधी रिद्धिमाने वहिनीविषयी दोन शब्द बोलले आणि लग्न असल्याचं कन्फर्म केलं. सोबतचं नीतू कपूर यांनी मुलगा रणबीर आणि सून आलियाचे गोडवे गाताना दिसल्या.
रिद्धिमा आलिया भट्टचं कौतुक करताना म्हणाली, खूप क्यूट आहे यार, खूप स्वीट आहे डॉलप्रमाणे…जेव्हा नीतू कपूर यांना मुलाच्या लग्नाविषयी आणि सुनेबद्दल विचारलं तर त्यावेळी नीतू म्हणाल्या, त्याच्याविषयी काय सांगू मी…तो बेस्ट आहे…
रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनीने लहंगा आणि साडी नेसून एंट्री घेतली. दोघींचाही हा लुक लक्षवेधी होता.
यावेळी नीतू आणि रिद्धिमा यांनी एका खास व्यक्तीच्या सांगण्यावरून लग्नाची तारीख जाहीर केली आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून रणबीर कपूर आहे. होय, रणबीरने आपल्या बहिणीला आणि आईला लग्नाची तारीख जाहीर करण्याचे सुचवले. रिपोर्टनुसार, रणबीर त्याच्या घराच्या बाहेर असलेल्या प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. त्यामुळे लग्न होणार की नाही, या चर्चांना पूर्णविराम मिळाला. १४ एप्रिललाच आलिया-रणबीरचं लग्न होणार असल्याचं कन्फर्म झालं.
मेहंदी फंक्शननंतर लगेचच नीतू कपूर यांनी लग्नाची तारीख उघड केली आणि सस्पेन्स संपवला. आता फक्त एका दिवसाची प्रतीक्षा आहे, त्यानंतर रणबीर आणि आलियाचा वधू-वराचा लूक सर्वांसमोर येणार आहे. या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे.
video – viralbhayani insta वरून साभार