

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर मोहर उमटविणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Neeraj Chopra ) याच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी माहिती घेण्यासाठी काहींची धडपड सुरु आहे. त्याची मुलाखत घेताना अनेक जण त्याला 'नकाे ते' प्रश्न विचारुन हैराण करत आहेत. याचा अनुभव नीरज याला आला. एका मुलाखतीमध्ये नीरज चोप्रा ( Neeraj Chopra ) याला थेट त्याच्या सेक्स लाईफ (लैंगिक जीवनाविषयी) विषयी विचारणा झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल देशभरातून नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव हाेत आहे.
नीरज विविध माध्यमांना मुलाखत देत असून आपल्या आजवरच्या क्रीडा प्रवासाविषयी सांगत आहे.
मात्र एका मुलाखतीमध्ये थेट त्याला त्याच्या सेक्स लाईफविषयी विचारणा झाली.
राजीव सेठी यांनी नुकतीच नीरज चोप्राची मुलाखत घेतली.
यावेळी सेठींनी प्रश्न विचारला की, नीरज तुम्ही प्रशिक्षण आणि सेक्स लाइफ याचे संतुलन कसे राखता, हा एक मूर्ख प्रश्न आहे, असेही सेठी या वेळी म्हणाले.
राजीव सेठी यांनी थेट सेक्स लाईफबद्दल विचारल्याने नीरज थोडा अस्वस्थ झाला.
मुलाखत नियंत्रकाने नीरजला या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, असे स्पष्ट केले.
त्यावेळी सेठी म्हणाले की, मला हे माहिती होते.
यावर नीरज याने सांगितले की, प्लीज सर, तुमच्या प्रश्नाने माझे मन भरले आहे.
माध्यमांना नीरजच्या खासगी आयुष्याविषयी कमालीची उस्तुकता आहे.
राजीव सेठी यांनी विचारलेल्या प्रश्नावर नीरज कमालीचा अस्वस्थ झाला.
त्याने आपण यावर उत्तर देणार नसल्याचे स्पष्ट केले.
राजीव सेठींनी नीरज चोप्राला विचारलेल्या प्रश्नामुळे राजीव सेठींवर सोशल मीडियामध्ये टीकेची झोड उठली आहे.
असा प्रश्न विचारण्यावर कारवाई करावी, अशी मागणी नेटकरांकडून होत आहे.
एकाने म्हटले आहे की, असा प्रश्न एका महिला खेळाडूला विचारला असता तर यौन शोषणाचे प्रकरण दाखल झाले असते.
हेही वाचलं का ?