सुहास एलवाय : देशाला पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारे पहिलेच IAS अधिकारी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : नोएडाचे डीएम सुहास एलवाय यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. तो रविवारी पुरुष एकेरीच्या एसएल 4 स्पर्धेत अव्वल मानांकित फ्रेंच शटलर लुकास मजूरकडून 21-15, 17-21, 15-21 असे पराभूत झाले.
तथापि, त्यांनी रौप्य पदकावर नाव कोरले. हे भारताचे एकूण 18 वे पदक आहे. आतापर्यंत भारताने 4 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदके जिंकली आहेत.
- इन्फोसिस देशद्रोही आणि तुकडे-तुकडे गँगची मदतनीस; आरएसएसचा गंभीर आरोप
- कृष्णा नागर याने घडवला इतिहास, बॅडमिंटनमध्ये सुर्वण पदकाला गवसणी
सुहास यांनी पहिला गेम 21-15 असा जिंकला. पुढच्या दोन सामन्यात त्यांनी कडवी झुंज दिली, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लुकासने 21-17 आणि 21-15 अशा दोन्ही गेम जिंकून सुवर्णपदक जिंकले.
SL4 वर्गात, तेच बॅडमिंटन खेळाडू भाग घेतात ज्यांच्या पायात आजार आहे आणि ते उभे राहून खेळतात. याआधी शनिवारी प्रमोद भगतने पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर मनोज सरकारने याच स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
- भाजप आमदार राम कदम : जावेद अख्तर यांचा एकही चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही
- सीएम बंगल्यात, मंत्री मंत्रालयाकडे फिरकेनात, सनदी अधिकारीही गायब, प्रशासन ठप्प
सुहास एलवाय : रौप्य पदक जिंकणारे देशातील पहिले प्रशासकीय अधिकारी
पॅरालिम्पिकमध्ये भाग घेण्याची संधी मिळवणारे आणि रौप्य पदक जिंकणारे ते देशातील पहिले प्रशासकीय अधिकारी आहेत. सुहास यांनी यापूर्वी युगांडा पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक आणि तुर्की आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
कोर्टामध्ये आणि बाहेर अनेक कामगिरी करणारे सुहास संगणक अभियंता आहेत आणि प्रशासकीय अधिकारी देखील आहेत.
ते 2020 पासून नोएडाचे जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांनी कोरोना महामारीविरोधात आघाडीचे नेतृत्व केले आहे.
- ऑलिम्पिक विजेतेच आता फक्त थेट तहसीलदार, उपजिल्हाधिकारी पदावर
- रोहित शर्माने गांगुली, अझरुद्दीन आणि धोनीलाही टाकले मागे
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शटलर सुहास यांनी इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदके मिळवली आहेत.
जकार्ता पॅरा एशियन गेम्स 2018 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या पुरुष संघात त्यांचा समावेश होता.
2017 मध्ये टोकियोमध्ये आयोजित जपान ओपन पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत ते उपविजेते राहिले. तर दुहेरीने एसएल 4 प्रकारात कांस्यपदक पटकावले.
हे ही वाचलं का?
- टोकिया पॅरालिम्पिक : बॅडमिनटनपटू प्रमोद भगतने जिंकले सुवर्णपदक!
- टोकियो पॅरालिम्पिक : दिव्यांगांकडून पदकांची लयलूट