Panjshir Vs Talibani : पंजशीरमध्ये ६०० तालिबान्यांचा खात्मा; १००० कैदेत | पुढारी

Panjshir Vs Talibani : पंजशीरमध्ये ६०० तालिबान्यांचा खात्मा; १००० कैदेत

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये तालिबान आणि नाॅर्दन आघाडीचे (Panjshir Vs Talibani) सैनिक यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. या संघर्षात पंजशीरच्या ईशान्य भागात ६०० तालिबान्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्पुतनिक न्यूजककडून आलेली आहे.

६०० तालिबान्यांना ठार केलेले असून १००० हजार तालिबानी कैद करण्यात आले आहेत, यातील अनेकांनी शरणागती पत्करली आहे, अशी माहिती नाॅर्दन आघाडीचे प्रवक्ते  फहीम दशती यांनी ट्विटवरून दिली आहे. याच्या उलट तालिबानने शनिवारी पंजशीरमध्ये कब्जा केल्याचा दावा केला होता. पण, हा दावा नाॅर्दन आघाडीचे नेते अमरुल्ला सालेह यांनी नाकारला आहे.

अफगाणिस्तानमधील पंजशीर एकमेव प्रांत

अफगाणिस्तानातील पंजशीर असा एकमेव प्रांत आहे जिथं अजूनही तालिबान्यांना कब्जा मिळवता आलेला नाही. माजी अफगाण गोरील्ला कमांडर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद आणि कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या नेतृत्वात याठिकाणी तालिबान विरुद्ध लढा दिला जात आहे. तालिबान्यांचा पंजशीर विरुद्धचा संघर्ष खूप जुना आहे. संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेला असला तरी पंजशीरवर (Panjshir Vs Talibani) आपल्या सत्तेचा झेंडा तालिबान्यांना रोवता आलेला नाही.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button