Tribe Woman Paraded Naked: महिलांचे धक्कादायक कृत्य! आदिवासी महिलेची विवस्त्र करून काढली धिंड; केशवपन अन् मारहाणही केली

Tribe Women Harassment
Tribe Women Harassmentpudhari
Published on
Updated on

Tribe Women Harassment: राजस्थानमधील बन्सवारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ४० वर्षाच्या आदिवासी महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून सामुहिक छळ करण्यात आला. तिचे कपडे उतरवून, केशवपन करून तिची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली.

Tribe Women Harassment
Korowai cannibal tribe : या जमातीच्या प्रथा ऐकून अंगावर काटा येईल? सत्‍य काय आहे?

ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यात महिलेला विवस्त्र करून तिच्यावर हल्ला करण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे या घृणास्पद कृत्यात आघाडीवर महिला होत्या. बाजूला असलेल्या महिला देखील या महिलेवर हसत होत्या अन् तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होत्या.

Tribe Women Harassment
Scheduled Tribe Benefits: धर्मांतरित आदिवासींच्या सवलतींचे धोरण ठरविण्यासाठी समिती

बन्सवारा डेप्युटी एसपी बाबू लाल रेगर यांनी सांगितलं की पोलिसांनी या प्रकरणी सात लोकांना अटक केली आहे. त्यात महिलेचा पती आणि इतर नातेवाईकांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पती आणि इतर गावकऱ्यांनी महिलेला रस्त्यावरून अनवानी चालवलं. त्यानंतर तिचे केशवपन करण्याच आले. इतर व्यक्तींनी तिच्यावर हल्ला केला. एका व्हिडिओत काही महिला या पीडित महिलेची कपडे फाडताना दिसत आहेत. तसेच काठीने मारहाण करताना देखील दिसत आहेत. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. बाकीच्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

Tribe Women Harassment
Nomadic Denotified Tribes Separate Census Column: राष्ट्रीय जनगणनेत भटक्या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र रकान्याची मागणी

डीएसपी रेगर यांनी सांगितलं की, 'हा व्हिडिओ ३ सप्टेंबर रोजी व्हायरल झाला आहे. मात्र याबाबतची एफआयआर १ सप्टेंबर रोजीच दाखल करण्यात आली आहे. महिला आणि पतीमध्ये वाद होता. आम्ही या प्रकरणी पतीला आणि इतर ६ जणांना अटक केली आहे.'

Tribe Women Harassment
Crime News : फोटोग्राफरच्‍या मृत्यूनंतरही प्रेयसीला येत राहिले २० दिवस मेसेज; एका बॅगने उघड केलं भयंकर सत्‍य!

अर्थुना स्टेश हाऊस ऑफिसर विनोद कुमार मीना यांनी सांगितलं की त्या महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की ती मजुरीचं काम करण्यासाठी शेजारच्या राज्यात जाते. दहा दिवसांपूर्वी ती ठेकेदाराकडे कामासंदर्भात भेटण्यासाठी गेली होती. मात्र तिच्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. तिला घरी आणले अन् तिच्यावर १ सप्टेंबर रोजी हल्ला केला.

Tribe Women Harassment
Nashik Crime News | उत्तर महाराष्ट्रात गुन्हेगारांवर कडक कारवाई; 182 सराइतांवर तडीपारीची टांगती तलवार!

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याच बरोबर आयटी अॅक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी त्या महिलेची वैद्यकीय चाचणी देखील केली असून या प्रकरणी सात जणांना अट करून पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news