Nomadic Denotified Tribes Separate Census Column: राष्ट्रीय जनगणनेत भटक्या-विमुक्त समाजासाठी स्वतंत्र रकान्याची मागणी

2026-27 जनगणनेत अचूक नोंदणीसाठी स्वतंत्र ओळख द्यावी; पुण्यात संघटनेची पत्रकार परिषद
Census
CensusPudhari
Published on
Updated on

पुणे: आगामी 2026-2027 च्या राष्ट्रीय जनगणनेत भटक्या व विमुक्त समाजाची अचूक नोंदणी व्हावी, यासाठी या समाजाला स्वतंत्र ओळख आणि स्वतंत्र रकाना देण्यात यावा, अशी आग््राही मागणी ‌‘एकात्म अखिल भारतीय घुमंतू विमुक्त जनहित महिला संघटना (महाराष्ट्र)‌’ यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Census
Pune Damodar Sahu 420 Case: ‘सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे अध्यक्ष दामोदर साहू 420 प्रकरणात सहआरोपी

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष उर्मिला पवार, डॉ. शिवलाल जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. देशात 20 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला हा समाज आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. जनगणनेच्या अर्जातील प्रश्न क्र. 12 मध्ये सध्या केवळ ‌‘इतर‌’ हा पर्याय उपलब्ध आहे, जो या समाजाच्या हिताच्या दृष्टीने अपुरा आहे.

Census
Pune PMFME Scheme Buyer Seller Meet: पुणे जिल्ह्यात पीएमएफएमई योजनेतून 2.99 कोटींचे खरेदी करार

जनगणनेत समाजासाठी स्वतंत्र, स्पष्ट आणि ठळक रकाना असावा, महाराष्ट्र राज्याप्रमाणेच प्रत्येक राज्याच्या जातींची यादी प्रश्नावलीसोबत जोडणे अनिवार्य करावे, अचूक माहितीसाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन जनजागृती मोहीम राबवावी, प्रश्नावली प्रादेशिक भाषेत आणि सोप्या शब्दांत असावी, अशी मागणी यावेळी केली असून, सरकारने या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news