Namdev Gharal
इंडोनेशियामध्ये पापुआ प्रांतातील घनदाट जंगलात राहणारी एक प्राचीन आदिवासी जमात आहे. जिचे नाव आहे कोरोवाई Korowai आदिवासी जमात
ही जमात त्यांच्या भयंकर प्रथाविषयी प्रसिद्ध आहे कारण ही जमात आहे नरभक्षी cannibal tribe माणसे मारुन त्यांचे मांस खाणारी आहे, यांचा बाहेरील जगाशी संबध आला १९७० रोजी
भूतकाळात या जमातीमध्ये नरभक्षणाची प्रथा अस्तित्वात होती; मात्र तो त्यांच्या आहाराचा भाग नव्हता. ही एक अंधश्रद्धेशी जोडलेली 'न्याय देण्याची' धार्मिक/आध्यात्मिक प्रथा होती.
कोरोवाई लोकांचा असा विश्वास होता की गूढ आजार किंवा अवेळी मृत्यू हा 'खाखुआ' नावाच्या दुष्ट जादुटोणा करणाऱ्या राक्षसामुळे होतो.
यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातून दुष्ट आत्म्याचा नायनाट करण्यासाठी ते आरोपीला मारून खात असत. किंवा या लोकांचा शस्त्रू असेल तर त्याला मारुन ते खात असत
विषेश म्हणजे आज ही प्रथा पूर्णपणे बंद झाली आहे. गेल्या काही दशकांत ख्रिश्चन मिशनरी, शासकीय हस्तक्षेप आणि आधुनिक जगाशी संपर्क आल्यामुळे ही जुनी प्रथा थांबली आहे.
याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे ही जमात जमिनीपासून ३० ते ५० फूट उंचीवर झाडांच्या शेंड्यावर लाकडी घरे (Treehouses) बांधण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
ही घरे बांधण्याचे कारण म्हणजे जंगलातील हिंस्त्र प्राणी, पूर आणि शत्रू टोळ्यांपासून रक्षण करण्यासाठी ते अशी उंच घरे बांधतात.
आज अनेक टीव्ही शो आणि सेन्सेशनल डॉक्युमेंट्रीज किंवा सोशल मिडीयावरील इन्फुएन्सर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोरोवाई लोकांना अजूनही 'सक्रिय नरभक्षक' म्हणून रंगवतात, जे निव्वळ एक प्रसिद्धीचे साधन आहे.