महाराष्ट्रातील तिघांना ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार’ प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

महाराष्ट्रातील तिघांना ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार’ प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्यासह प्रतीक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज शनिवारी राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशील शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रतीक कदम हा नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी असून दिवेश गिन्नारे हा नागपूर येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये 'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार-२०२०-२१' प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाचे सचिव संजय कुमार आणि क्रीडा विभागाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी उपस्थित होत्या. या विशेष कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या श्रेणीत देशातील एकूण १० कार्यक्रम अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. यात सुशील शिंदे यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चैताली चक्रवर्ती यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूप शिंदे यांना रजतपदक, प्रमाणपत्र आणि दीड लाख रूपये तर डॉ. चक्रवर्ती यांना चषक आणि २ लाख रुपये प्रदान करण्यात आले. प्रतीक कदम यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर, दिवेश गिन्नारे यांनी शासनाच्या सांप्रदायिक सौहार्द निधी भरीव योगदान देत विविध जनजागरुकता कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news