पिंपरी : बिस्किटाचे पैसे देण्यावरून दंगा; पाच जणांना अटक | पुढारी

पिंपरी : बिस्किटाचे पैसे देण्यावरून दंगा; पाच जणांना अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बिस्किटाचे पैसे देण्याच्या कारणावरून दंगा करण्यार्‍या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री साईनगर, गहुंजे येथे घडली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फुलताज पन्नू खान (वय 18), राहुल पन्नू खान (वय 23), योगेश तात्याराम लवटे (वय 30), पांडुरंग कचरू नेंगुळे (27, रा. आंबेठाण, ता. खेड), नवनाथ चंदर शीरकनवाड (30, रा. ताथवडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फुलताज याने साईनगर येथील एका किराणा दुकानातून बिस्कीट घेतले. बिस्किटांचे पैसे कमी दिल्याने आरोपींचा आपसात वाद झाला. आरोपींनी सार्वजनिक रोडवर जमाव जमवून शिवीगाळ व भांडण करण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना समजावून सांगितले. मात्र, तरीही आरोपी एकमेकांसोबत भांडण करीत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button