हॉटेलच्या अतिक्रमणावर हातोडा, बाणेरमध्ये महापालिका प्रशासनाची कारवाई

हॉटेलच्या अतिक्रमणावर हातोडा, बाणेरमध्ये महापालिका प्रशासनाची कारवाई

बालेवाडी, पुढारी वृत्तसेवा: बाणेर-बालेवाडी परिसरात अनेक हॉटेल, बार व पब यांनी अनधिकृतपणे जागा व्यापली आहे. या भागात शुक्रवारी अतिक्रमणविरोधी विभागाने कारवाई केली. यात मदारी हॉटेल, पबचे टेरेसवरील व साइड मार्जिनमधील अतिक्रमण काढले.
बांधकाम विकास विभाग झोन 3 च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. यात जवळपास वीस हजार स्क्वेअर फुटांवरील अतिक्रमण हटविण्यात आले. या हॉटेलमुळे होणारी वाहतूक कोंडी, रात्रीचे वाढलेले उपद्रव, पार्किंगला जागा न सोडता सर्रासपणे रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने इतर हॉटेल, बार व्यावसायिकांवर देखील कारवाई करावी व यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडिमे म्हणाले, 'या अतिक्रमणाला नोटीस पाठविल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. परिसरात अतिक्रमणे वाढली असून, त्यावर कारवाई केली जाणार आहे.' कार्यकारी अधिकारी श्रीकांत वायदंडे, उपअभियंता जयवंत पवार, संग्राम पाटील, गंगाप्रसाद दंडिमे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

क्रॉसविंड सोसायटी परिसरातही समस्या

बाणेर-बालेवाडी परिसरातील हॉटेल, बार आदींच्या वाहन पार्किंगच्या समस्यांबाबत अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. क्रॉसविंड सोसायटीसमोर असलेल्या रस्त्यावर अनेक अतिक्रमणे व पार्किंग अस्ताव्यस्त होत असल्यानेही या ठिकाणीही समस्या भेडसावत आहे. यामुळे महापालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news