विरोधकांची ‘एकजूट’ मोहीम सुरु, नीतीशकुमार आणि लालूप्रसाद यादव घेणार सोनिया गांधींची भेट | पुढारी

विरोधकांची 'एकजूट' मोहीम सुरु, नीतीशकुमार आणि लालूप्रसाद यादव घेणार सोनिया गांधींची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नीतीश कुमार आणि मी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहोत. आम्‍ही विरोधी पक्षांना एकत्रीत करण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत, अशी माहिती राष्‍ट्रीय जनता दलाचे ( आरजेडी ) प्रमुख आज लालूप्रसाद यादव यांनी आज सकाळी दिल्‍ली येथे दिली. बिहार सरकारमधून भाजप हद्‍दपार झाले आहे असून, आता २०२४ लोकसभा निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होणार आहे, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

लालूप्रसाद यादव आज सकाळी दिल्‍ली येथे आले. बिहार सरकारमधून भाजप हद्‍दपार झाले आहे असून, आता २०२४ लोकसभा निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होणार आहे. त्‍यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चिंताग्रस्‍त आहे. ते बिहारला जंगलराज म्‍हणत आहेत. मात्र गुजरातचे गृहमंत्री असताना त्‍यांनी काय केले, असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.

नितीशकुमार आणि मी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहोत. यावेळी आम्‍ही विरोधी पक्ष एकत्रीत येण्‍याबाबत चर्चा करणार आहोत. बिहारमधून सत्तेतून बाहेर पडल्‍यानंतर भाजप आता राज्‍याला जंगलराज म्‍हणत आहे;मग अमित शहा गुजरातचे गृहमंत्री असताना येथे का होते, असा सवालही त्‍यांनी केला.

रविवार २५ सप्‍टेंबर रोजी बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार आणि राजद प्रमुख लालूप्रसाद यादव हे सोनिया गांधी यांची भेट घेतील, असे वृत्त एएनआय वृत्तसंस्‍थेने दिले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button