देशात १ ऑक्टोबरपासून 5-जी सेवा; पंतप्रधानांच्या हस्ते हाेणार शुभारंभ | पुढारी

देशात १ ऑक्टोबरपासून 5-जी सेवा; पंतप्रधानांच्या हस्ते हाेणार शुभारंभ

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात १ ऑक्टोबरपासून 5जी सेवा सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये 5G सेवेचा शुभारंभ करतील. 5 जी सेवा सुरू झाल्यास 4 जीपेक्षा 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, सरकारने अल्पकालावधीत देशात 5 जी दूरसंचार सेवांचे ८० टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात  5जी दूरसंचार सेवा देशभरातील सुमारे १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. 5जी  किरणोत्सर्गाच्या प्रभावाबाबतची शंका फेटाळून लावत ते म्हणाले होते की, 5 जी सेवेद्वारे निर्माण होणाऱ्या रेडिएशनची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शिफारस केलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी असणार आहे.

आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान मंच असल्याचा दावा करून, इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) हे दूरसंचार विभाग (DoT) आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे. प्रगती मैदानावर होणारी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’ ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button