Kunal Kamra Post Umar Khalid: माझं नाव उमर खालिद, म्हणूनच मी दहशवादी... कामराने पोस्ट केलं उमरचं 'मनोगत', वादाची ठिणगी पडणार?

उमर खालिदच्या मनातील भावना व्यक्त करणारी ५ पानी पोस्ट कुणाल कामराने केली आहे.
Kunal Kamra Post Umar Khalid
Kunal Kamra Post Umar Khalidpudhari
Published on: 
Updated on: 

kunal kamra post on umar khalid : प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून वाद आंगावर ओढवून घेण्याची सोय करून घेतली आहे. कुणाल कामराने आता उमर खालिदच्या समर्थनार्थ पोस्ट केली असून उमर खालिद हा दहशवादी नसल्याचा दावा त्याने केलेला आहे. यामुळं भाजप आणि शिवसेनेसह सत्ताधारी नेते कामराविरूद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Kunal Kamra Post Umar Khalid
Umar Khalid | उमर खालिदला कोर्टाचा झटका; दिल्लीच्या कडकडडुमा कोर्टाने अंतरिम जामीन याचिका फेटाळली

उमर खालिदच्या मनातील भावना व्यक्त करणारी पोस्ट कुणाल कामराने केली आहे. सत्ताधारी पक्ष आणि माध्यमांवर खालिदच्या तुरूंगवासाचे खापर फोडले आहे. कुणार कामराच्या नव्या पोस्टने पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कुणाल कामारने ५ पानांची भली मोठी पोस्ट उमर खालिदच्या समर्थनात लिहिली आहे.

Kunal Kamra Post Umar Khalid
Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी उमर खालिदने जामीन नाकारल्यानंतरही आनंद का व्यक्त केला? मैत्रिणीने सांगितले कारण

उमरच्या शब्दातच बोलला कुणाल

कुणाल कामराने या पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, 'तुम्ही उमर खालिदबाबत विविध माध्यमांद्वारे ऐकलं असेल. मात्र माध्यमे त्याच्याबाबत विच हंटची भूमिका निबावत आहे. या सर्व घडामोडीत मला त्याच्याशी बोलण्याची छोटी अन् छोट्या काळाची संधी मिळाली. गेले सहा वर्षे तो जेलमध्ये घालवत आहे. त्यामुळं मी आता माझा मित्र उमर खालिदबाबत काही सांगणार आहे. तेही त्याच्याच शब्दात. ही मते त्याच्या कुटुंबाने आणि मित्रांनी व्यक्त केली आहेत.'

Kunal Kamra Post Umar Khalid
Kunal Kamra: कुणाल कामराला कोर्टाची नोटीस; एकनाथ शिंदेंवर टीका करणं भोवलं, कोर्टात काय घडलं?

पोस्टमधील प्रमुख मुद्दे

दहा वर्षांनंतर बदलेले वास्तव

"माझं नाव उमर खालिद आहे आणि मी दहशतवादी नाही." हे वाक्य आता जुनं झालं आहे, जे मी १० वर्षांपूर्वी बोललो होतो. एका दशकानंतर आजचं खरं वास्तव हे आहे की "माझं नाव उमर खालिद आहे आणि म्हणूनच मला 'दहशतवादी' म्हटले जाते."

'ते' कोण आहेत? सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते टीव्ही चॅनेल्सवर येऊन मला "राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका" ठरवतात.

Kunal Kamra Post Umar Khalid
Kunal Kamra Controversy | महाराष्ट्रात लवकरच पाच शो, शिंदेंच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा; कामराने पुन्हा डिवचलं

'बौद्धिक दहशतवादी' (Intellectual Terrorist) असा शिक्का

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी असणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयात मला "बौद्धिक दहशतवादी" असे संबोधले. "जेव्हा बुद्धिवंत हे दहशतवादी बनतात, तेव्हा ते सर्वात जास्त धोकादायक असतात," असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला.

Kunal Kamra Post Umar Khalid
Kunal Kamra | कुणाल कामराच्या हस्ते पलावा उड्डाण पुलांच उद्घाटन ?

UAPA कायद्यांतर्गत अटक आणि दीर्घ तुरुंगवास

मला सप्टेंबर २०२० मध्ये यूएपीए (UAPA - बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) या कठोर दहशतवादविरोधी कायद्याखाली अटक करण्यात आली आणि तेव्हापासून (गेल्या अनेक वर्षांपासून) मी तुरुंगातच आहे.

पण नक्की मी असा कोणता 'दहशतवादी गुन्हा' केला आहे? एखादा बॉम्बस्फोट? विमान अपहरण? की कोणाचे अपहरण? माझ्यावर लादलेला दहशतवादाचा आरोप म्हणजे फेब्रुवारी २०२० मध्ये महाराष्ट्रातील एका लहान शहरात मी दिलेले भाषण, ज्यामध्ये मी गांधीजींचे 'अहिंसा' आणि 'सत्याग्रह' हे विचार मांडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news