

दिल्लीत २०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात व्यापक निदर्शनांच्या दरम्यान दंगली उसळल्या. या दंगली अनेक दिवस चालू राहिल्या. हिंसाचारात ५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि शेकडो जखमी झाले होते
Umar Khalid on SC denies bail
नवी दिल्ली : दिल्ली दंगलींचा कट रचल्याचा आरोप असलेल्या उमर खालिद आणि शर्जील इमाम या दोघांना आज (दि.५) सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला. तथापि, या प्रकरणात अपील दाखल केलेल्या गुल्फिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान आणि शादाब अहमद या पाच जणांना काही अटींसह न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उमर खालिद आणि शर्जीलच्या प्रकरणात, न्यायालयाने स्पष्ट केले की, "जामिनाच्या बाबतीत न्यायालय सर्वांना समान वागणूक देऊ शकत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उमर खालिदने त्याची मैत्रीण बनोज्यत्स्ना लाहिरीला सांगितले की, इतरांना जामीन मिळाल्याने तो आनंदी आणि समाधानी आहे, जरी त्याला स्वतःला जामीन मिळाला नाही. बनोज्यत्स्ना हिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, उमर तिला म्हणाला, "ज्यांना जामीन मिळाला त्यांच्यासाठी मी खूप आनंदी आहे." जेव्हा बनज्योत्स्ना म्हणाली, "मी उद्या तुम्हाला भेटायला येईन," तेव्हा उमर म्हणाला, "छान, ये. आता हेच जीवन आहे."
दिल्लीत २०२० मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात व्यापक निदर्शनांच्या दरम्यान दंगली उसळल्या. या दंगली अनेक दिवस चालू राहिल्या. हिंसाचारात ५० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि शेकडो जखमी झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिल्ली भेटीदरम्यान हे दंगली घडल्या होत्या. परिणामी, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाला दंगली भडकवण्याचा एक मोठा कट असल्याचे म्हटले. पोलिसांनी आरोप केला की दंगली आपोआप घडल्या नव्हत्या तर पूर्वनियोजित कट होता. त्यांनी म्हटले की हे भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी एक गुन्हेगारी कट होता, ज्याचा उद्देश सरकार बदलण्यासाठी दबाव आणणे असा होता.