Kunal Kamra | कुणाल कामराच्या हस्ते पलावा उड्डाण पुलांच उद्घाटन ?

कल्याण शिळं रस्त्यावर झलकवले मुहूर्ताचे होर्डिंग; मनसेने केलं डोंबिवकीकरांची एप्रिल फुल्ल
Thane
कल्याण शिळं रस्त्यावर झलकवले मुहूर्ताचे होर्डिंगPudhari News Network
Published on
Updated on

ठाणे : शुभम साळुंके

कल्याण शिळं रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण झाले आहेत. भूमिपूजन होऊन कित्तेक वर्ष दोन्ही उड्डाणपूल लटकलेल्या स्थितित आहेत. पुलांच्या कामांच्या पूर्णत्वाच्या तारखा सत्ताधारी सातत्याने देत होते. मात्र वेळेत पूल न झाल्याने मंगळवारी (दि.1) रोजी मनसेचे नेते राजू पाटील यांनी डोंबिवलीकरांच एप्रिल फुल्ल करून पालकमंत्री आणि एमएमआरडीए कडून उत्तर देखील मागवलं आहे.

कल्याण शिळं रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन उड्डाणपुलांची काम हाती घेण्यात आली होती. आयटीपी प्रोजेक्ट असलेल्या पलावा चौकात दोन उड्डाणपूल तयार करण्यात येणार होती. तत्कालीन नगरविकास मंत्री व आताचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुलांच्या कामाचं भूमिपूजन झालं होतं. मात्र पुलांची काम वेगाच्या राजकारणात कासवगतीने सुरू राहिल्याने अपूर्ण झाली आहेत. सत्ताधारी पक्षाकडून पुलांच्या कामाची पाहणी आणि तारखा सातत्याने देखील आल्या होत्या. विशेष बाब म्हणजे ठेकेदाराला अल्टीमेटम देखील देण्यात आले होते. मात्र पुलांची काम अपूर्ण राहिली अन नागरिकांचा वाहतुक कोंडीचा त्रास कमी झालाच नाही. त्यामुळे मनसे नेते माजी आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी ट्विट करत पलावा उड्डाण पुलाची तारीख जाहीर केली आहे. या पुलाच्या उद्घाटनाला कुणाल कामरा येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एक्स पोस्ट मध्ये पाटील म्हणतात, तारखांच्या आश्वासनांनी 'फुल्ल' ! कधी होणार दोन्ही पलावा पुल ?

….की, बनत होता..बनत आहे.. बनतच राहील पलावा पूल ? भल्या पहाटे मनसेने केलेल्या एप्रिल फुल्लची चर्चा मात्र डोंबिवली शहरात जोरदार सुरू झाली आहे.

पालवा पुलाचे काम संथ गतीने चालू असल्याने मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी एप्रिल फुल्ल निम्मित एक्स पोस्ट करत बॅनर बाजी केलीये..दरम्यान एक्स पोस्ट करत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एमएमआरडीए उत्तर द्या, असे म्हणाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news