

Kunal Kamra on upcoming show in Maharashtra
मुंबई - स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा वाद थांबायचे काय नाव घेईना. कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका केली होती. ही टीका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याला मोठ्या वादाला सामोरे जावे लागले. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना या वादावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीकेनंतर कामराने एक्स अकाऊंटवर ट्विट करत उत्तर दिले. 'लवकरच मी महाराष्ट्रात स्टँड अप कॉमेडी शो घेणार आहे शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा. हो, माझी औकात नाही, माझा शो चार लोक बघतात, मला आणि मला दुर्लक्ष केलं जाऊ शकते,' असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. 'ऑक्टोबर महिन्यात मी नाशिक, मुंबई, नवी मुंबई नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे शो घेणार आहे', असेही कामराने नमूद केलं आहे.
कॉमेडियन कुणाल कामराने उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ''अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला हवं. पॉलिटिकली अशा लोकांना इग्नोर करणं अधिक योग्य होईल. टीका करणाऱ्या लोकांना दुर्लक्ष केलं पाहिजे होतं. लायकी नाही, तुम्ही ते वाढवत आहात.''
फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर एक्स अकाऊंटवर शेअर करत कुणाल कामराने उत्तर दिलं . त्याने ट्विटमध्ये म्हटलंय- ''हॅलो, देवेंद्र फडणवीस तुम्ही योग्य करत आहात. राजकीय दृष्टीकोनातून माझ्याकडे दुर्लक्षच करणे योग्य ठरेल. माझी लायकी नाही आणि केवळ ४ लोक माझा शो पाहतात, कृपया काय माझ्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं?''
''ऑक्टोबरमध्ये मी ठाणे -न्यू मुंबई-मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर-औरंगाबादमध्ये शो चे नियोजन करत आहे...''कुणाल कामराने असेही नमूद केलं.