West Bengal Election Results 2026| ममतांच्या पराभवावर 'बाबरी' ची घोषणा करणारे हुमायून कबीर खुश; म्हणाले, "खूप लुटलं..."

तृणमूल काँग्रेसने निवडणुकी आधी केली होती पक्षातून हकालपट्टी
West Bengal Election Results 2026
कोलकाता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार हुमायून कबीर ममता बॅनर्जी यांच्‍या पराभवामुळे आनंदात आहेत. Pudhari
Published on
Updated on

West Bengal Election Results 2026

कोलकाता पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे बाबरी मशीद बांधण्याची घोषणा करणारे तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार हुमायून कबीर ममता बॅनर्जी यांच्‍या पराभवामुळे आनंदात आहेत. तृणमूल काँग्रेसकडून भाजपने सत्ता हिसकावून घेतल्‍यानंतर आनंद व्यक्त करताना त्यांनी 'जे झाले ते चांगलेच झाले' अशी प्रतिक्रिया दिली आहे. बाबरी मशिदीच्या बांधकामाची घोषणा केल्यानंतर टीएमसीने आपल्या हुमायून कबीर यांचीपक्षातून हकालपट्टी केली होती.

'इंग्रजांपेक्षाही जास्त लुटलं'

'एएनआय'शी बोलताना हुमायून कबीर यांनी ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पराभव केल्याबद्दल बंगालच्या जनतेचे अभिनंदन केले. टीएमसीच्या राजवटीत इंग्रजांपेक्षाही जास्त लूट झाली, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, "जे झाले ते चांगलेच झाले, हे तर होणारच होते. ममता बॅनर्जींनी तीन वेळा मुख्यमंत्री होऊन पुतण्याला इतकी ताकद दिली. लोकांची फसवणूक केली आणि लोकांचे पैसे लुटले. ब्रिटिशांनी १००-२०० वर्षांत जेवढे लुटले नसेल, तेवढे यांनी १५ वर्षांतच लुटले. आज मी बंगालच्या जनतेचे अभिनंदन करेन की त्यांनी लुटमार करणाऱ्या टीएमसीला चोख प्रत्युत्तर दिले आहे."

दोन्‍ही मतदारसंघात हुमायून यांचा विजय

मला राजकारण करण्याचा अधिकार आहे आणि ममता बॅनर्जींनाही आहे. पण त्या चुकीच्या कामात गुंतल्या होत्या. भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडालेल्या टीएमसीला आता त्यांचे उत्तर मिळाले आहे." दोन जागांवर विजय निश्चित केलेले हुमायून कबीर म्हणाले की, ते दोन्ही जागांचे विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच घरी जातील. कोणती जागा स्वतःकडे ठेवायची आणि कोणती रिक्त करायची, याचा निर्णय नंतर घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

West Bengal Election Results 2026
Bengal Poll Row | "तो 'सिंघम' असेल तर मी पुष्पा" : पश्‍चिम बंगालमध्‍ये मतदानापूर्वी 'राजकीय' वादळ!

टीएमसीच्या पराभवात हुमायून कबीर यांची चर्चा का?

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या पराभवासाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये हुमायून कबीर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. तृणमूलचे मदार असताना कबीर यांनी बंगालमध्ये बाबरी मशीद बांधण्याची घोषणा केली होती. सुरुवातीला पक्षाने यापासून अंतर राखले, पण ध्रुवीकरण वाढू लागल्यावर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.कबीर यांनी पोलीस संरक्षणात बाबरी मशिदीची पायाभरणीही केली. यामुळे राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला, ज्याचा मोठा फटका ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला बसला.

West Bengal Election Results 2026
West Bengal Election Results 2026 Live: पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; ममता बॅनर्जींच्या तृणमूलचा पराभव; कोणाला किती जागा?

हुमायून यांनी केली नव्‍या पक्षाची स्‍थापना

टीएमसीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि एआयएमआयएम (AIMIM) सोबत युती करून उमेदवार उभे केले. मात्र, निवडणुकीच्या मध्यातच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये ते 'भाजपशी हातमिळवणी' केल्याची कबुली देताना दिसत होते. त्यानंतर ओवेसींच्या पक्षाने त्यांच्याशी युती तोडली. कबीर यांनी मात्र तो व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले होते.

West Bengal Election Results 2026
West Bengal Assembly Election : ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर 'जय श्री राम'चा जयघोष! घोषणाबाजीने परिसर दुमदुमला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news