महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय बांधवांमध्ये आरक्षणाच्या ( obc reservation ) मुद्यावर असंतोष आहे,असा दावा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी केला. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत हजार राहण्यासाठी त्या नवीन दिल्लीत आल्या होत्या.( obc reservation ) :बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यातील सहकार, राजकीय स्थिती तसेच इतर महत्वांच्या मुद्यावर प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.
महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक होत असल्याने या मर्यादेहून अधिकचे आरक्षण रद्द होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वच आरक्षण रद्द झाले. महाराष्ट्रात त्यामुळे ओबीसी बांधवांमध्ये तीव्र संताप आहे. राज्यात मराठा बांधवांना देण्यात आलेले आरक्षण सुद्धा रद्द झाले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यामुळे महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. विधानसभेच्या स्तरावर काही बदल करता येत असतील तर ते केले पाहिजे, असे आवाहन यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला केले. पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
राज्यामध्ये सहकार अडचणीत असून दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका बसला असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्याही साखर कारखाना तोट्यात असल्याचे त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांसाठी ऊस गाळप करीत असताना शेतीवर आधारीत उद्योगांना त्यामुळे वेगळी वागणूक न देता उसाचे भाव वाढवले जातात तशाच प्रकारे साखर, इथेनॉलच्या किंमतीसंबंधी निर्णय घ्यायला हवा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तोट्यात असलेल्या कारखान्यांसंबंधी भूमिका घेवून कारखाने चालू राहतील याची काळजी घ्यायला हवी. नुसते निवडणुकांसाठी कारखाना तो शेतकऱ्यांसाठी आहे. काही बदलांनंतर कारखाने चालू राहतील. नुकसान होणार नाही आणि राजकीय हस्तक्षेप कमी होईल,असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. काही लोकांमुळे साखर उद्योगात नकारात्मकता आली आहे. अनेक उद्योग अडचणीत आल्यानंतर देशातील उद्योगपती ते उद्योग हातात घेतात.त्यामुळे साखर उद्योगाकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. साखर उद्योगाचे व्याज माफ केले पाहिजे. सरकारने कर्जाची हमी घ्यायला हवी. यासाठी सरकारने पॅकेज द्यायला हवे, अशी भूमिकाही पंकजा मुंडे यांनी मांडली.
महागाई, पेट्रोलचे भाव यासंबंधी भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "राष्ट्रीय सचिव म्हणून मला असे वाटते की, महागाईवर तोडगा निघायला पाहिजे. महागाई नसली पाहिजे, सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असेच पंतप्रधानांचे ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अँग्रोबेस्ड उद्योग चालवताना शेतकर्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले जातात. पंरतु, प्रोडक्टमध्ये नफा मिळाला नाही तर उद्योग तोट्या जातो. पर्यायाने शेतकऱ्यांसमोर अडचणी येतात. साखर कारखान्याची परिस्थिती तशीच झाली आहे. याबाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यावेळी मदत केली. त्यांनी साखरेचे भाव स्थिर केले. इथेनॉलसह इतर करांसंबंधी देखील चांगले निर्णय घेतले. गडकरींचा सहकार क्षेत्रात मोठा अभ्यास आहे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी यावेळी गडकरींची स्तुती केली.