अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने बहिणीने केला सख्ख्या भावाचा खून | पुढारी

अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने बहिणीने केला सख्ख्या भावाचा खून

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

प्रियकरासोबतचे अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने नागपुरातील एका अल्पवयीन मुलीने आपल्याच सख्ख्या १२ वर्षीय भावाचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित प्रियकर आणि अल्पवयीन मुलीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले आहे.

नागपुरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्रुगधामना येथे हा प्रकार घडला. बारा वर्षीय मृत मुलगा हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहाव्या वर्गावीत शिकायचा. त्याची आई खासगी नोकरी करते तर वडील माथाडी कामगार आहेत. दोघे कामावर गेले असताना मुलगा आणि त्याची १७ वर्षीय बहीण घरी होते.

बहिणीने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, संबधित मुलीने माझा भाऊ हा दुकानात जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला. दीड तासानंतर तो ‘वाचवा, वाचवा’ असं ओरडत घरी आला. आपण त्याला पाणी प्यायला दिलं. त्यानंतर तो झोपला.

मात्र शेजाऱ्यांनी पाहिले असता त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा दिसत होत्या. यावेळी मृतकाच्या आई-वडिलांसोबतच पोलिसांनाही कळवण्यात आले. माझा भाऊ हा हा आरडाओरड करत घरी आला. त्याचा बाहेरच कोणीतरी गळा आवळण्यात आल्याचा बनाव करुन बहिणीने पोलिसांची दिशाभूल करण्याचे बरेच प्रयत्न केले.

मात्र घटनास्थळी आढळलेल्या आक्षेपार्ह पुराव्यामुळे बहिणीचा बनाव उघड झाला. अनैतिक संबंधांचा पर्दाफाश होऊ नये म्हणून बहिणीनेच भावाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी १७ वर्षीय मुलगी आणि तिचा प्रियकर या दोघांची चौकशी करुन रात्री उशिरा रात्री अटक केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button