‘हिजाब परिधान करणारी महिला पंतप्रधान बनेल’ : ओवैसींच्या वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

ओवेसी
ओवेसी
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : एमआयएम या पक्षाचे अध्यक्ष ‎असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. दिल्लीतील वकिल विनीत जिंदल यांनी ही तक्रार केली आहे. ‎कर्नाटक आणि देशभरात हिजाब प्रकरणावरुन गेले काही दिवस वाद सुरू आहे. ‎असदुद्दीन ओवैसी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होते की 'एक दिवस हिजाब परिधान करणारी महिला पंतप्रधान बनेल'. या विधानावर वकील विनीत जिंदाल यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

हिजाब प्रकरण न्यायालयात : विनीत जिंदल

वकील विनीत जिंदल यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात विचाराधीन आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्याकडून मुस्लीम समुदायाची मते मिळवण्यासाठी अशी वक्तव्ये केला जात आहेत. असदुद्दीन ओवैसी धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत. मुस्लीम समुदायाला भडकवण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या हिजाब परिधान करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे, असेही त्‍यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news