Jhund song : अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील ‘आया ये झुंड है’ गाणे रिलीज | पुढारी

Jhund song : अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील 'आया ये झुंड है' गाणे रिलीज

पुढारी ऑनलाईन

अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’च्या (Jhund song) निर्मात्यांनी चित्रपटाआधी ‘आया ये झुंड है’ गाण्याचे टीजर जारी केला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळेने ‘सैराट’च्या यशानंतर पुन्हा एकदा संगीत दिग्दर्शक जोडी अजय-अतुलसोबत पुन्हा एकदा काम केलं आहे. टायटल ट्रॅक अतुल गोगावलेने गायले आहे. (Jhund song)

तरुण मुले आणि एक मुलगी एका ग्रुपमध्ये आपल्या हातामध्ये खेळाचे साहित्य घेऊन येते असताना दिसताहेत. एकीकडे अमिताभ बच्चन उभारलेले दिसतात.

‘झुंड’मध्ये ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरुदेखील आहेत. नागराज मंजुळे द्वारा लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ही एका प्रोफेसर (अमिताभ बच्चन) ची कहाणी असून जे रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची फुटबॉल टीम बनवण्याची प्रेरक कथा आहे.

ही टी-सीरीज, तांडव फिल्म्स एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड आणि एटपत फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत भूषण कुमार, कृष्ण कुमार, राज हिरेमठ, सविता हिरेमठ, नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी आणि मीनू अरोरा यांची निर्मिती आहे. हा चित्रपट ४ मार्च, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर २०१८ मध्ये नागपूर येथे झाले होते. स्टार ‘झुंड’च्या निर्मात्यांनी अधिकृत फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च केले होते. ‘झुंड’ हा एक हिंदी क्रीडा विषयावरील चित्रपट आहे. झोपडपट्टी सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्‍ये अमिताभ बच्चन एका प्राध्यापकाची भूमिका साकारत असून, रस्त्यावरच्या मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करून त्‍यांची फुटबॉल टीम ते तयार करतात, अशी त्यांची भूमिका आहे.

विजय बरसे यांच्या कहाणीवर आधारित चित्रपट

झुंडची कहाणी ‘स्लम सॉकर फाउंडेशन’ चे संस्थापक आणि कोच विजय बरसे यांच्या कहाणीवर आधारित आहे. चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन विजय बरसे यांच्या व्यक्तीरेखेत असतील.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

Back to top button