नाशिकमध्ये गंगाघाटावर यजमान पळवण्यावरून पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण (video) | पुढारी

नाशिकमध्ये गंगाघाटावर यजमान पळवण्यावरून पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण (video)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : यजमान पळवण्याच्या वादातून आज पंचवटीत गंगाघाटावर पुरोहितांमध्ये तुंबळ भांडण झाले. यामुळे दशक्रिया व इतर विधींसाठी राज्यभरातून आलेल्या नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.

नाशिक येथे दक्षिण गंगा गोदावरी दक्षिण वाहिनी होते. त्यामुळे पितरांच्या पिंडदानासाठी नाशिकच्या रामघाटाचे मोठे महत्व आहे. यामुळे येथे राज्यभरातून भाविक पूर्वजांच्या पिंडदान विधीसाठी येत असतात. तसेच अस्थिविसर्जनासाठीही हिंदूंच्या दृष्टीने रामघाटाचे मोठे महत्व आहे. येथे रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी विधी करण्यासाठी पुरोहितांची वतने ठरलेली आहेत. मात्र, बऱ्याचदा नियम मोडून एकमेकांचे यजमान पळवण्याचे प्रकार घडत असतात. तसाच प्रकार आज सोमवारी (दि.१४) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

यावेळी दोन पुरोहितांमध्ये मोठमोठ्या आवाजात झालेल्या भांडणामुळे गंगाघाटावर विधीसाठी आलेले भाविक तेथे जमा झाले होते.

Purohit Sangh Wad, www.pudharinews

जवळपास अर्धातास हे भांडण सुरू होते. त्र्यंबकेश्वर येथेही यजमान पळवण्यावरून नेहमीच वाद असताना दोन महिन्यांपूर्वी त्या वादाचे पर्यावसान नाशिक येथे एकमेकांवर धारदार शस्त्र व घातक शस्त्राने वार करण्यापर्यंत मजल गेली होती.

हेही वाचा :

पाहा व्हिडिओ : नाशिकमध्ये गंगाघाटावर यजमान पळवण्यावरून पुराेहितांमध्ये तुंबळ भांडण

Back to top button