भविष्यात माणूस सायबॉर्ग बनू शकणार? पहा काय आहे नवी टेक्नॉलॉजी | पुढारी

भविष्यात माणूस सायबॉर्ग बनू शकणार? पहा काय आहे नवी टेक्नॉलॉजी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मानवाची उत्क्रांती एका लहान जीवाणूपासून झाली आहे. निसर्गाच्या कोट्यवधी वर्षांच्या प्रक्रियेनंतर आज आपण मानव बनलो आहोत. पण पुढील काळात आपली प्रगती कशी होईल? ती निसर्गावर आधारावर असेल का? कदाचित नाही. मनुष्यप्रजाती आज त्या टप्प्यावर उभा आहे, जिथे आपल्या उत्क्रांतीचे स्वरूप भविष्यात कसे असेल हे ठरवणे कठीण झाले आहे? आता मानव रॅंडम नॅचरल सिलेक्शनच्या आधारे पुढे जाणार की येणार्‍या भविष्यात त्याचा रंग, रूप, विचार कसा असेल हे माणूस स्वतः ठरवेल का? जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असे शोध लावले जात आहेत, जे भविष्यात आपल्याला साइबोर्ग बनवू शकतात. एलोन मस्क यांच्या खासगी कंपनी न्यूरालिकने गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात अनेक मोठे शोध लावले आहेत. आज आपण जाणून घेऊया की सायबॉर्ग्स म्हणजे काय आणि येणाऱ्या काळात तंत्रज्ञान आपले स्वरूप कसे बदलणार आहे?

Rahul Bajaj : बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे निधन

सायबॉर्ग

सायबॉर्ग ही संकल्पना भविष्यातील मानुष्यप्रजाती कशी असू शकते, याचा एक अंदाज आहे. भविष्यात सायबॉर्ग्स हे असे मानव असतील, ज्यांच्या शरीरात अनेक प्रकारची मशीन्स आणि मेंदूच्या चिप्स असतील. या दिशेने संशोधकांची अनेक कामे सुरू आहेत. न्यूरालिकमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ एक विशेष प्रकारची चिप बनवत आहेत, जी थेट तुमच्या मेंदूच्या न्यूरल नेटवर्कशी जोडली जाईल.

या चिपच्या मदतीने भविष्यात मानवी वर्तन, त्यांची विचार करण्याची क्षमता आणि शारीरिक ताकद वाढवता किंवा कमी करता येऊ शकते. याबद्दल इलॉन मस्क म्हणतात की, आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा धोका मानवांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत या जगात आपले अस्तित्व वाचवण्यासाठी मानवाला भविष्यात सायबॉर्ग बनावे लागेल, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. आमचे हे तंत्रज्ञान भविष्यात मानवाची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्याचे काम करेल, जेणेकरून ते येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मुकाबला करू शकतील.

Vibhu Raghave : अभिनेता विभू राघवेची कॅन्सरशी झुंज, रूग्णालयातून शेअर केला व्हिडिओ

ब्रेन चिप तंत्रज्ञान ही या शतकातील सर्वात मोठी क्रांती ठरू शकते. याच्या मदतीने दिव्यांग पुन्हा बरे होऊ शकतात. याशिवाय, या चिपच्या मदतीने मानवी मेंदू आणि मशीनमध्ये इंटरफेस तयार करण्यात मदत होईल. या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे शोध लागले आहेत. ब्रेन चिपची संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांद्वारे वर्तवली जात आहे. यामुळे आगामी काळात मनुष्य प्रजातीमध्ये मोठा बदल होणार आहे.

Back to top button