BJP New Strategy : उत्तर प्रदेशाचे राजकारण मराठी नेत्यांच्या हाती, महाराष्ट्रात दोन नवे ‘बिग बॉस’

हिंदी पट्ट्यात मराठी वजन! उत्तर प्रदेश, गोव्यासह दिल्लीतही महाराष्ट्रातील नेत्यांवर मोठी जबाबदारी
BJP New Strategy: Vinod Tawde Gets UP Charge
Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज घोषित केलेल्या विविध राज्यांच्या प्रभारी यादीमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय भवितव्य आता मराठी प्रभारींच्या हाती आले असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात विनोद तावडे हे प्रभारी असतील, अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. आता पुण्यातील राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर भारतात सध्या सुरू असलेला सामाजिक आणि जातीय संघर्ष लक्षात घेऊन मेधा कुलकर्णी यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील सर्वांत मोठ्या हिंदी भाषक राज्याचे प्रभारीपद दुसऱ्या मोठ्या राज्याकडे म्हणजेच महाराष्ट्राकडे येणे ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाब मानली जात आहे.

मेधा कुलकर्णी यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा त्या तामिळनाडू येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान संसदीय समितीच्या बैठकीसाठी गेल्या होत्या. त्या संसदेच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षा आहेत. पर्यावरणपूरक संस्थांचा अभ्यास करत असताना ‘अभिनंदन’चे फोन सुरू झाल्यानंतरच त्यांना या नियुक्तीची माहिती मिळाली. उत्तर प्रदेशातील ही मोठी जबाबदारी पेलण्यासाठी त्या सज्ज असल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

BJP New Strategy: Vinod Tawde Gets UP Charge
Election Commission : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तत्काळ अटक करा; ममता बॅनर्जी यांची मागणी

दरम्यान, महाराष्ट्रातील अन्य एका महिला नेत्या लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या, तरी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोवा राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खानदेशातील माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील अभ्यासू व प्रभावी नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यावर दिल्लीची धुरा सोपवण्यात आली आहे. दिल्ली राज्य लहान असले, तरी ‘आप’च्या कारवाया आणि राष्ट्रीय राजकारणातील दिल्लीचे महत्त्व पाहता मराठी नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय डॉ. भागवत कराड यांच्याकडेही प्रभारीपदाची जबाबदारी आली असून, डॉ. अलका गुर्जर या मराठी नावाचाही यादीत समावेश आहे.

BJP New Strategy: Vinod Tawde Gets UP Charge
Railway Employees Pension Scheme : रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारचे मोठे गिफ्ट! आता निवृत्तिवेतनासाठी ‘यूपीएस’चा नवा पर्याय उपलब्ध

महाराष्ट्रासाठी जय पांडा आणि अमित मालवीय

महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रभारी बैजयंत 'जय' पांडा हे शांत, संयमी आणि ‘टास्क मास्टर’ म्हणून ओळखले जातात. भाजपमध्ये कोणताही गाजावाजा न करता दिलेले काम चोख पार पाडणारे नेते अशी त्यांची ख्याती आहे. मूळचे ओडिशाचे असलेले पांडा हे आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे वळण आणतील, असे मानले जात आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांच्याही विश्वासातील मानले जातात. कोणतीही मोहीम गाजावाजा न करता आखणे आणि प्रभावीपणे राबवणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

BJP New Strategy: Vinod Tawde Gets UP Charge
Election Commission : अंतर्गत टिपण्या ही नियमित प्रक्रिया, गेल्या वर्षभरातील सर्व निर्णय एकमताने निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

त्यांच्यासोबतच गेली काही वर्षे भाजपच्या सोशल मीडिया विभागाची धुरा सांभाळणारे अमित मालवीय यांची महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जंतर-मंतर आंदोलनादरम्यान भाजपच्या सोशल मीडियाला आक्रमक भूमिका निभावता आली नाही, अशी टीका मालवीय यांच्यावर झाली होती. सोशल मीडियाचे प्रमुख असल्याने ते पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांच्या सातत्यपूर्ण संपर्कात असतात. सध्या महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे आघाडी आणि युतीच्या राजकारणामुळे अत्यंत संवेदनशील वळणावर असताना, थेट दिल्लीच्या शीर्ष नेतृत्वाशी संबंध असलेल्या या दोघांची नियुक्ती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

BJP New Strategy: Vinod Tawde Gets UP Charge
BJP State in charge List: भाजपात मोठे बदल; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी, राम माधवांकडे दोन राज्य

याशिवाय गोव्याचे सदानंद तानावडे आणि दिल्लीच्या कमलजीत सेहरावत हेही सहप्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. सेहरावत या दक्षिण दिल्लीच्या माजी महापौर असून महिला वर्गामध्ये त्या प्रभावी नेत्या मानल्या जातात. एकंदरीत, भाजपच्या नव्या रचनेत मराठी नेत्यांवर विविध राज्यांची महत्त्वाची जबाबदारी सोपवून मोठे वजन देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news