BJP State in charge List: भाजपात मोठे बदल; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी, राम माधवांकडे दोन राज्य

Vinod Tawde Medha Kulkarni Uttar Pradesh Bjp Incharge Co in Charge: विनोद तावडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी असतील.
BJP State IN Charges List Vinod Tawde Medha Kulkarni Ram Madhav Smriti Iran.jpg
BJP State IN Charges List Vinod Tawde Medha Kulkarni Ram Madhav Smriti Iran.Pudhari
Published on
Updated on

Bjp Incharge Co in Charge List In Marathi

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आगामी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. भाजपने बुधवारी राज्य प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती केली आहे. यात स्मृती इराणी यांची हरयाणा- छत्तीसगडच्या प्रभारीपदी, विनोद तावडेंची उत्तर प्रदेश प्रभारीपदी, मेधा कुलकर्णींची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारती पवार यांच्याकडे गोवा प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या सहा पैकी तीन राज्यांची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी बुधवारी 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले. खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे दिल्ली प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी कोण?

महाराष्ट्रासाठी वैजयंत जय पांडा यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अनेक वर्ष भाजपच्या आयटी सेलची जबाबदारी सांभाळणारे अमित मालवीय यांना महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर सदानंदशेट तानावडे आणि कमलजीत सहरावत यांच्याकडे सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

BJP State IN Charges List Vinod Tawde Medha Kulkarni Ram Madhav Smriti Iran.jpg
Rahul Bondre bjp joining canceled | राहुल गांधींचा एक फोन..अन् क्षणात बदलला निर्णय! बोंद्रे यांचा भाजपा प्रवेश रद्द; बुलढाण्यात राजकीय नाट्य

भाजपचे उत्तर प्रदेशकडे विशेष लक्ष

भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेशचे महत्त्वाचे स्थान आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून भाजपने या निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. भाजपच्या यादीत उत्तर प्रदेशला महत्त्व दिल्याचे दिसते. विनोद तावडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी असतील. याशिवाय महाराष्ट्राच्या खासदार मेधा कुलकर्णी, जगदीश पटेल, प्रदीप वर्मा आणि अनंत ओझा यांना उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिहारमध्ये भाजपचे प्रभारी कोण?

बिहारमध्ये भाजपची महायुती सत्तेत आहे. या राज्यातही प्रभारी- सहप्रभारींची भक्कम फळी नियुक्त करण्यात आली आहे. अनुभवी नेते हरीष द्विवेदी हे भाजपचे प्रभारी असतील तर संगीता यादव, रोहन गुप्ता हे सहप्रभारी असतील.

पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, गोव्यातील प्रभारी कोण?

पुढील वर्षी पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. यात पंजाबसाठी डॉ. सतीश पुनिया हे प्रभारी तर वीरेंद्र सचदेवा, अलका गुज्जर सहप्रभारी असतील.

हिमाचलप्रदेशमध्ये डॉ. श्रीकांत शर्मा प्रभारी तर दर्शना सिंह सहप्रभारी आहेत. गोव्यात डॉ. भारती प्रवीण पवार या प्रभारी तर अनिल एंटनी सहप्रभारी आहेत. हरयाणात स्मृती इराणी प्रभारी तर डॉ. भोला सिंह सहप्रभारी आहेत. उत्तराखंडमध्ये राम माधव प्रभारी तर अरविंद मेनन आणि बांसुरी स्वराज या सहप्रभारी आहेत.

सहा नेत्यांकडे एकापेक्षा जास्त राज्यांची जबाबदारी

स्मृती इराणी - छत्तीसगड, हरयाणा

हरीश द्विवेदी - बिहार, कर्नाटक

डॉ. सतीश पुनिया- जम्मू काश्मीर आणि पंजाब

राम माधव – तामिळनाडू आणि उत्तराखंड

सुनील बंसल – तेलंगणा, पश्चिम बंगाल

अनिल एंटनी - नागालँड, गोवा (सहप्रभारी)

BJP State IN Charges List Vinod Tawde Medha Kulkarni Ram Madhav Smriti Iran.jpg
BJP President Nitin Nabin | भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांनी तीन महिन्यांचे वेतन दिले बिहारच्या पूरग्रस्तांसाठी!

प्रभारी- सहप्रभारी यांचे नेमके काम काय असते?

पक्षांतर्फे राज्यनिहाय प्रभारी - सहप्रभारी नियुक्त केले जातात. पक्षबांधणी, रणनिती आखणे, उमेदवार निवडणे अशा निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news