पोरानं सांगितला न्‍यूटनचा नियम, आयएएस म्‍हणाले, हा तर कोरोना काळातील 'न्‍यूटन' | पुढारी

पोरानं सांगितला न्‍यूटनचा नियम, आयएएस म्‍हणाले, हा तर कोरोना काळातील 'न्‍यूटन'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
कोरोनाचा नवा व्‍हेरियंट ओमायक्रॉनची सध्‍या सर्वत्र चर्चा सुरु आहे. वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे अनेक राज्‍यांमध्‍ये नव्‍याने निर्बंध लादण्‍यात आले आहेत. काही ठिकाणी शाळाही पुन्‍हा एकदा ऑनलाईन सूरु झाल्‍या आहेत. न्‍यूटनचा नियम समजवून सांगण्‍यासाठी या मुलाने थेट कोरोना महामारीचे उदाहरण दिले आहे. याची माहिती आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्‍विटरच्‍या माध्‍यमातून दिली आहे.

COVID-19 Booster Shots : बुस्‍टर डोससाठी नव्‍याने नोंदणीची गरज नाही

शरण यांनी आपल्‍या ट्‍विटमध्‍ये लिहलं आहे की, ” न्‍यूटनचा चौथा नियम : जेव्‍हा कोरोना वाढतो तेव्‍हा अभ्‍यास कमी होतो. जेव्‍हा कोरोना वाढतो तेव्‍हा अभ्‍यास वाढतो. याचा अर्थ कारोना कमी झाला की अभ्‍यास वाढतो.” या शाळकरी मुलाने कोरोना आणि अभ्‍यास याचा संबंध स्‍पष्‍ट करताना एक समीकरण मांडलं आहे. हा शाळकरी मुलगा कोरोना युगातील न्‍यूटन आहे, असेही शरण यांनी म्‍हटलं आहे.

या ट्‍विटला आतापर्यंत ११ हजारपेक्षा अधिक लाईक्‍स मिळाल्‍या आहेत.या ट्‍विटला मजेशीर कमेंटही आल्‍या आहेत. एकाने म्‍हटलं आहे, ” कोरोनाचा नवा कायदा आला आहे. तर आणखी एकाने म्‍हटलं आहे की, न्‍यूटनचा कोरोनाचा चौथा नियम”.

हेही वाचलं का?

Back to top button