

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी आज शनिवारी दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली असून त्यात पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच संबंधित राज्यांतील कोविड तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेतला. सदर राज्यातील प्रशासनांनी लसीकरण मोहिमेला वेग द्यावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आल्याचे समजते.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब तसेच मणिपूर या राज्यांमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणुका होणार आहेत. गेल्या काही काळात कोरोनाचे संकट वाढल्याने निवडणुका लांबणीवर टाळण्याची मागणीही होत आहे. पण निवडणुका टाळण्याचे संकेत अद्यापपर्यंत आयोगाने दिलेले नाहीत.