नाशिक : महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना सुधाकर तोरणे यांचे निधन | पुढारी

नाशिक : महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा साधना सुधाकर तोरणे यांचे निधन

नाशिक , पुढारी वृत्तसेवा: महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्षा सौ. साधना सुधाकर तोरणे (वय ८१) यांचे शुक्रवारी (दि.७) रोजी रात्री निधन झाले.

साधना सुधाकर तोरणे या उच्च विद्याविभूषित आहेत.  त्यांनी डबल एमए, बीएड, ज्योतिष शास्त्री, ‘डेफ अँड डम्‍ब’ची पदवी संपादन केल्‍या हाेत्‍या. मुंबई आणि पुण्यात अनेक वर्ष त्‍यांनी मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम केलं आहे. पुणे, नाशिक येथील विविध समाजसेवी संस्थामध्ये पदाधिकारी आणि तेजस्विनी महिला संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी असताना संस्थेला अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा समाजकार्यासाठी असलेला पुरस्कार मिळाला होता.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे निवृत्त संचालक सुधाकर तोरणे यांच्या पत्नी तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्या त्या मातोश्री होत्या. सातत्याने वृत्तपत्रीय लेखन, बालनाट्याच्या दिग्दर्शिका, महिला सबलीकरणासाठी अनेक विविध उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकाळात राबविले होते.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button