Corona Alert : विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एका आठवड्याचे गृह विलगीकरण सक्तीचे

Corona Alert : विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एका आठवड्याचे गृह विलगीकरण सक्तीचे
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एका आठवड्याचे गृह विलगीकरण सक्तीचे ( Corona Alert ) करण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अतिशय वेगाने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

जगातील अनेक देशांत कोरोनाची लाट आली असून भारतातही ओमायक्रॉन स्ट्रेनच्या ( Corona Alert ) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तेथेच चाचणी घेतली जाईल. या चाचणीचे निष्कर्ष आल्यानंतरच त्यांना विमानतळ सोडण्याची मुभा असेल. ज्या प्रवाशांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांच्यासाठी एका आठवड्याचे गृह विलगीकरण सक्तीचे राहील. आठवडाभरानंतर त्यांना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. यातही एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर तो अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविला जाईल.

जे लोक विमानतळावरच पॉझिटिव्ह सापडतील, त्यांना आयसोलेशन केंद्रात पाठविण्यात येईल. स्टॅण्डर्ड प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार केले जातील. त्यानंतर सदर प्रवासी आणखी कोणाच्या संपर्कात आला होता का, याचा शोध घेण्याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांची असेल. ( Corona Alert )

इटलीहून अमृतसरला आलेल्या विमानातील १२५ प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. त्यातच गुरुवारी (दि. ६ ) इटलीहून अमृतसरला आलेल्या विमानातील १२५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विमानतळाचे संचालक वीके सेठ यांनी सांगितले की अमृतसरमध्ये पोहचल्यावर हे प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

इटलीच्या मिलान या शहरातून अमृतसरला आलेले चार्टर विमान (वाययू-६६१) मधील १७९ पैकी १२३ प्रवाशांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पंजाबचे आरोग्य अधिकारी या सर्व घटनेवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच या १२५ प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

अनेक डॉक्टर्सना कोरोनाची लागण

आतापर्यंत मुंबई, दिल्ली, कोलकाता, पाटणा, चंडीगड, लखनौ, पटियाला आदी शहरात डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसलेला आहे. राज्याची राजधानी मुंबईमध्ये डॉक्टर्स संक्रमित होत आहेत. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या रुग्णालयांतील 260 डॉक्टर्स कोरोनाबाधित झाले आहेत. गुरुवारी सायन रुग्णालयातील 30 निवासी डॉक्टर्सना कोरोनाची बाधा झाली होती. पंजाबमधील चंदीगड पीजीआय रुग्णालयातील परिस्थिती बिघडली असून गत दोन दिवसांत येथे 196 डॉक्टर्स आणि कर्मचारी बाधित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news