Jawed Habib viral video : अखेर हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबने मागितली माफी, महिलेच्या केसावर थुंकला होता

Jawed Habib viral video : अखेर हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबने मागितली माफी, महिलेच्या केसावर थुंकला होता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये जावेद हबीबने महिलेचे केस कापताना थुंकी लावून केस कापलेले होते. यावरून सोशल मीडियावर जावेदवर प्रचंड प्रमाणात टीका झाली. महिला वर्गातूनही टीका करण्यात आली. त्याच्यावरे एफआयरदेखील दाखल करण्यात आले. या सगळ्या प्रकारावर जावेद हबीबने एक व्हिडिओ शेअर करत झाल्या प्रकारावर माफी मागितली आहे. (Jawed Habib viral video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jawed Habib (@jh_hairexpert)

व्हिडिओमध्ये जावेद म्हणतो की, "माझ्या सेमिनार दरम्यान माझ्याकडून बोलल्या गेलेल्या शब्दांवर काही लोकांनी आक्षेप घेतला. माझ्याकडून झालेल्या कृतीचा निषेध करण्यात आला. मी फक्त एक सांगू इच्छितो की, माझे सेमिनार प्रोफेशनल वर्कशाॅप असतात. त्यात माझ्या क्षेत्राशी संबंधित लोक सहभागी होतात. या सेमिनारचा वेळही जास्त असतो. त्यामुळे त्या सेमिनार्सना मजेदार करण्यासाठी माझ्याकडून हा प्रकार झाला. तुम्ही खरंच माझ्याकडून दुखावला गेला असाल, तर मी अत्यंत तळमळीने तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला क्षमा करा."

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं घडलं काय?

व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जावेद हबीब हा केस कापताना पाण्याऐवजी थुंकी लावून केस कापतो. इतकंत नाही तर जावेद म्हणतो की, या थुंकीमध्ये जीव आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियामधून जावेद हबीबवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. त्याचबरोबर व्हिडीओनंतर महिलांच्याही रिएक्शन्स समोर आलेल्या आहेत. मात्र, जावेद हबीबकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

संपूर्ण घटना अशी आहे की, जावेद हबीब हा व्हिडीओ मुजफ्फरनगरमधील आहे. व्हिडीओमध्ये जावेद एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलवतो. तिचे केस कापताना तो म्हणतो की, "माझे केस घाणेरडे आहे. कारण मी शॅम्पू लावलेला नाही. लक्ष लावून ऐका… जर पाण्याची कमी असेल ना…", असे वाक्य उच्चारून जावेद महिलेच्या केसांवर थुंकतो. (Jawed Habib viral video)

या प्रकारानंतर प्रेक्षकांमधून टाळ्या वाजविल्या जातात. मात्र, संबंधित महिला ही अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. जावेदने ज्या महिलेच्या केसांवर हा किळसवाणा प्रयोग केलेला आहे, त्या महिलेचे नाव पूजा गुप्ता आहे. या महिलेची प्रतिक्रिया आलेले आहे. ती म्हणते की, "माझं एक ब्युटी पार्लर आहे. मी जावेद हबीब यांचा सेमिनार अटेंड केला. त्यामध्ये त्यांनी गैरवर्तन केले. त्यांनी माझे केस कापताना थुंकीचा वापर करून माझे केस कापण्याचा प्रयत्न केला. पण मी केस कापून घेतले नाही. मी साध्या पार्लरमध्ये जाऊन केस कापेन. पण जावेद हबीबकडून कापणार नाही."

हे वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news