स्कोडाची नवी स्लाविया : दमदार फिचर आणि स्टायलिश

स्कोडाची नवी स्लाविया : दमदार फिचर आणि स्टायलिश
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

स्कोडा या कंपनीने नुकतीच स्लाविया ही मीड सेगमेंट सेडान प्रकारातील कार लाँच केली आहे. या कारची किंमत अधिकृतरीत्या मार्च महिन्यात जाहीर केली जाणार आहे, पण या कारची किंमत ९ ते १६ लाख (एक्सशोरूम) असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

मार्च महिन्यात ही कार रस्त्यांवर धावू लागेल. 

मीड सेगमेंट सेडानच्या प्रकारात सध्या नव्याने कोणत्या कार आलेल्या नाहीत. यापूर्वी होंडाने ५व्या जनरेशनची सिटी लाँच केली होती. आता स्कोडाने स्लाविया लाँच केलेली आहे. कंपनीच्या या सेगमेंटमधून बऱ्याच अपेक्षा आहेत. 

स्कोडाने MQB A0 IN हा प्लॅटफॉर्म काही वर्षांपूर्वी लाँच केलेला आहे. यावर आधारीत Kushaq आणि Taigun या SUV सध्या बाजारात आहेत. भारतीय स्थितीचा अंदाज घेऊन त्यासाठी विशेष कार बनवण्यासाठी हा प्लॅटफॉर्म बनवण्यात आला आहे, याच प्लॅटफॉर्मवर स्लाविया ही कार आहे. 

स्कोडा स्लाविया आहे रॅपिडपेक्षा मोठी

ही कार रॅपिडपेक्षाही मोठी आहे. या कारच्या व्हिल बेस या सेगमेंटमधील सर्वोत्तम आहे तर बूट स्पेस ५२१ लीटरची देण्यात आली आहे. 

स्कोडा म्हणून ठळक ओळख दाखवणारे डिझाईन तर आहेच शिवाय इतरही विविध फिचर्स देण्यात आले आहेत. 

स्कोडामध्ये टर्बो इंजिनचे २ ऑप्शन असतील. ११५ एचपी आणि १५० एचपी या क्षमतेचे इंजिन ऑप्शन मिळतील. इंजिन क्षमता या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम असणार आहे. Honda City, Hyundai Verna and Maruti Suzuki Ciaz या कारसाठी स्पर्धक ठरू शकणार ही कार असेल. 

फोक्सवॅगन ग्रुपने भारतासाठी म्हणून नवे धोरण स्वीकारलेले आहे, त्याचा भाग म्हणून ही कार लाँच करण्यात आलेली आहे. 

ग्राहक आणि कार चाहत्यांना ही कार किती भावते, हे येत्या काही महिन्यातच कळून येईल..

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news