TATA Blackbird : टाटाकडून लवकरच १० लाखांत एसयुव्ही कार, जबरदस्त फिचर्ससह ‘या’ वाहनांना देणार टक्कर | पुढारी

TATA Blackbird : टाटाकडून लवकरच १० लाखांत एसयुव्ही कार, जबरदस्त फिचर्ससह 'या' वाहनांना देणार टक्कर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय बनावटीची टाटा ही बाजारपेठेतील प्रसिद्ध कंपनी म्हणून नावारूपास आहे. टाटाकडून नवनवीन एसयुव्ही कार बाजारात आणल्या जात आहेत. आगामी काळात टाटा एक उत्तम एसयुव्ही कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टाटाकडून प्रत्येक सेगमेंटसाठी आपल्या कार बाजारात आणल्या आहेत. (TATA Blackbird)

दरम्यान बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या एसयुव्ही वाहनांना टक्कर देण्यासाठी टाटाकडून जबरदस्त फिचर्स असलेलही कार बाजारात येणार आहे. पाच जणांना पुरेल अशी कम्फर्ट फॅमिली एसयुव्ही कार म्हणून याची ओळख असणार आहे. तसेच या कारची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

TATA Blackbird : जबरदस्त फिचर्ससह एकदम कम्फर्ट

मागच्या काही वर्षात टाटाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची निर्मीती केली जात आहे. परंतु मध्यम आकाराची एसयुव्ही कार टाटाकडून लाँच करण्यात आली नव्हती, या कारची कमतरता दूर करण्यासाठी टाटाकडून एसयुव्ही बाजारात आणली जाणार आहे.

ही SUV भारतीय बाजारपेठेत Hyundai Creta, Kia Celtos, Nissan Kicks, Renault Duster यांच्या पंगतीत येऊन बसणार आहे. टाटाकडून या कारचे नाव ब्लॅकबर्ड असे ठेवले आहे.

भारतात नवीन एसयुव्ही कार येणार म्हटले की ग्राहकांना उत्सुकता लागते. टाटाकडून कमी किंमतीत सगळे फिचर्स मिळतील अशी या कारची रचना करण्यात आली आहे. ब्लॅकबर्डचे आत्तापर्यंत समोर आलेले फोटो पाहता ग्राहकांना या कारचे वेड लागले आहे असे दिसून आले आहे.

ही कार हॅरियर आणि सफारी सारख्या एलईडी प्रणालीने सुसज्ज असेल. टाटाकडून ब्लॅकबर्ड ही कार अल्फा प्लॅटफॉर्मवर विकसित केली जात आहे.

इतर एसयुव्ही कारना टक्कर देण्यासाठी टाटाकडून कारची निर्मीती

टाटाकडून Nexon आणि Altroz ​​सारखी वाहने देखील अल्फा प्लॅटफॉर्मवर बनवली जातात. ब्लॅकबर्डमध्ये नेक्सॉनचे इंजिन सिस्टीम आपल्याला पहायला मिळणार आहे. Nexon मध्ये १२००cc टर्बो पेट्रोल इंजिन आणि १५००cc डिझेल इंजिन असणार आहे.

टाटा ब्लॅकबर्डच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर बेस मॉडेलची किंमत १० लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या कारमध्ये अनेक फीचर्स उपलब्ध असतील. सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, मोठी टचस्क्रीन म्युझिक सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग अशी अनेक वैशिष्ट्ये या वाहनात उपलब्ध असतील.

ब्लॅकबर्डची किंमत क्रेटा आणि सेल्टोस सारख्या वाहनांच्या जवळपास असणार आहे. ही कार २०२३ पर्यंत लॉन्च केली जाणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून बोलले जात आहे.

Back to top button