विशाखापट्टणम; पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे वन अधिकाऱ्यांनी 2 टन (2000 किलो) वजनाच्या व्हेल शार्क माशाची सुटका केली आहे. त्याला पुन्हा समुद्रात परत पाठवण्यात आले आहे.
१८ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथील तांथडी समुद्रकिनारी मासेमारीच्या जाळ्यात काही स्थानिक मच्छिमारांना एक मोठी व्हेल शार्क अडकलेली आढळली. स्थानिक वन्यजीव छायाचित्रकाराने तत्काळ वनविभागाला याची माहिती दिली. विशाखापट्टणम IFS अनंत शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीएफओ, वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जगातील सर्वात मोठा मासा आणि धोक्यात असलेली प्रजाती व्हेल शार्क असल्याचे स्पष्ट केले.
वनविभाग, मच्छीमार आणि वन्यजीव संरक्षक यांच्या सहकार्याने 2 टन वजनाच्या व्हेल शार्कची सुटका करून समुद्रात परत पाठवण्यात आले. आता व्हेल शार्क पुन्हा समुद्राच्या खोलवर गेला आहे. व्हेल शार्कचे फोटो ओळखण्यासाठी आता मालदीवमधील शार्क रिसर्च टीमला पाठवण्यात आल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
हेही वाचलं का?