‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स’ : परफेक्ट शॉटसाठी 46 व्या मजल्यावरून 19 वेळा मारली उडी | पुढारी

‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स’ : परफेक्ट शॉटसाठी 46 व्या मजल्यावरून 19 वेळा मारली उडी

पुढारी ऑनलाईन

हॉलीवूड अभिनेता कियानू रिव्हज याचा ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स’ हा मॅट्रिक्स फ्रँचायजीतील चौथा चित्रपट भारतात रीलिज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कियानू रिव्हजला एक प्रश्‍न विचारण्यात आला होता. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काही वेडेपणा तू केलास का? त्यावर कियानू म्हणाला की, होय, इमारतीवरून उडी मारणे.

कदाचित 46 वा मजला असावा. पहाटेच्या वेळी नैसर्गिक प्रकाशात हे शूटिंग करायचे होते. त्यामुळे आम्ही एकमेकांचा हात पकडला आणि उडी मारली. कियानू रिव्हज आणि अभिनेत्री कॅरी अ‍ॅन मॉसचे वय अनुक्रमे 57 वर्षे आणि 54 वर्षे आहे; पण दोघांनीही अत्यंत प्रोफेशनल राहत व्हीएफक्सला नकार देत या द‍ृश्याच्या परफेक्ट शॉटसाठी 46 व्या मजल्यावरून तब्बल 19 वेळा उडी मारली आणि 19 व्या वेळी तो शॉट परफेक्ट झाला. या चित्रपटात प्रियांका चोप्रादेखील आहे.

 

Back to top button