Gujarat panchayat polls: घरातील १२ सदस्‍यांपैकी उमेदवाराला एकाचेही मतदान नाही!, केवळ स्‍वत:च्‍या मतावर मानावे लागले समाधान | पुढारी

Gujarat panchayat polls: घरातील १२ सदस्‍यांपैकी उमेदवाराला एकाचेही मतदान नाही!, केवळ स्‍वत:च्‍या मतावर मानावे लागले समाधान

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन

‘अरं, तू तर दुनियेच्‍या निवडणुकीच्‍या भाषा करतोस, तुला घरातल्‍यांचं तरी मत पडलं का? ‘, आपल्‍याकडील कट्‍ट्यावरील हा नेहमीचाच डॉयलॉग. राजकारण आणि निवडणुकीवर हमरी-तुमरीवर चर्चा सुरु झाली की, चर्चा थंडावण्‍यासाठी हा डॉयलॉग सुनावलाच जातो. मात्र याचा प्रत्‍यक्ष अनुभव गुजरातमधील सरपंचपदाची (Gujarat panchayat polls) निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला आला आहे.

Gujarat panchayat polls: निवडणूक लढवली,पदरी नामुष्‍की पडली

गुजरातमधील वापी जिल्‍ह्यातील छारवाला गावात सरपंच पदासाठी निवडणूक झाली. गावातील तरुण संतोष याने मोठ्या उत्‍साहाने निवडणूक रिंगणात उडी घेतली. अर्ज भरला. प्रचारही केला; पण या निवडणुकीचा निकाल लागल्‍यानंतर त्‍याला धक्‍काच बसला. कारण संतोषच्‍या कुटुंबात एकुण १२ मते होती.किमान या १२ जणांची मते आपलीच आहेत, असा आत्‍मविश्‍वास त्‍याला होता. गावात कोणी मते दिली नाही तरी घरातील प्रत्‍येक जण आपल्‍यालाच मतदान करणार, असा त्‍याचा ठाम विश्‍वास होता. मात्र निकालानंतर याला तडा गेला.

स्‍वत:च्‍या मतावर मानावे लागले समाधान

निवडणूक निकाल समोर आल्‍यानंतर संतोषला मोठ्या नामुष्‍कीला सामोरे जावे लागले. त्‍याला घरातील १२ सदस्‍यांपैकी एकही मत पडलं नाही. त्‍याच्‍या नावावर केवळ एक मत नोंदले गेले. तेही त्‍याचे स्‍वत:चे. यामुळे आपण निवडणूक का लढवली, असा प्रश्‍न संतोषाला पडला आहे. आता त्‍याचे उत्तर ना त्‍याच्‍याकडे आहे की, त्‍याच्‍या कुटुंबीयांकडे. मात्र आता एक झालयं घरातल्‍यांनीच नाकारलेल्‍या या उमेदवार ओढावलेल्‍या नामुष्‍कीची चर्चा सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून गुजरातमध्‍ये होत आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडिओ :

Back to top button