टीईटी पेपरफुटी प्रकरण : सौरव त्रिपाठीला लखनाै येथून अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला लखनाै येथून बेड्या ठोकल्या आहेत.
सौरव त्रिपाठी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सैल अंतर्वस्त्र घालणार्या पुरुषांमध्ये शुक्राणू १७ टक्के जास्त, संशोधनातून सिद्ध
2018 मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहीरातीनुसार 15 जुलै 2018 रोजी ही परिक्षा घेण्यात आली होती. तर तिचा निकाल 12 ऑक्टोंबर 2018 मध्ये लागला होता. या परीक्षेतील घोटाळ्यात साैरव त्रिपाठी याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला लखनाै येथून अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
Khalistani : कंगना राणावतने मुंबई पोलिसांकडे मागितली वेळ
ही सर्व परिक्षा धेण्याची जबाबदारी जी. ए. सॉफ्टवेअरकडे होती. अश्विनकुमार महाराष्ट्रासाठी व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता. त्याचयावर परीक्षेचे आयोजन व निकाल संकेत स्थळावर प्रसिध्द करण्याची जबाबदारी होती. त्याचाच फायदा घेऊन जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा व्यवस्थापक अश्विन कुमार याने नेमणुक असलेल्या तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे (6 ऑगस्ट 2016 ते दि. 31 ऑगस्ट 2018), तुकाराम सुपे, प्रितीश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी संगनमत करून गैर व्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा
यशस्वी शस्त्रक्रिया! मेंदूतील पाणी नळी टाकून आणले पोटात, बालक ठणठणीत
पुणे महापालिका : पदोन्नतीप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी
गोवा : राणे विरुद्ध राणे, पिता-पुत्रात लढत होणार