वाशिम : थरार! गोळीबार आणि चाकूने वार करून सराफाला लुटले, कामगाराचा मृत्यू | पुढारी

वाशिम : थरार! गोळीबार आणि चाकूने वार करून सराफाला लुटले, कामगाराचा मृत्यू

वाशिम : अजय ढवळे

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात एका ज्वेलर्स मालकावर प्राणघातक हल्ला करून त्याला लुटण्याची घटना घडली. हल्लेखोरांनी गोळीबार करून आणि चाकूने वार करून ज्वेलर्स मालकाला लुटले. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्स हे दुकान बंद करून योगेश अंजनकर आणि त्यांचा सहकारी रवी वाळेकर हे दोघे रात्री पावणे दहा वाजेच्या दरम्यान घरी जात होते. योगेश अंजनकर आणि रवी वाळेकर हे घरी बॅग घेऊन जात असताना तीन मोटारसायकलवरून आलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी चाकूने वार केले आणि गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये योगेश अंजनकर यांचा सहकारी रवी वाळेकर यांचा गोळी लागून मृत्यू झाला. तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

गंभीर जखमी झालेल्या रवी वाळेकर यांना वाशिम येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. तर योगेश अंजनकर यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत अज्ञात चोरट्यांची मोटरसायकल घटनास्थळी आढळून आली. घटनास्थळी सापडलेली मोटरसायकल चोरीची असल्याचे समजते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद…

Back to top button