Virat and Rohit : विराटचा खुलासा, रोहित शर्माची 'ही' सवय वेंधळेपणाच...

पुढारी ऑनलाईन डेस्क
सध्या भारतीय क्रिकेटमध्ये दोन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. एक विराट कोहली आणि दुसरा रोहित शर्मा ( Virat and Rohit ) . दोन्ही खेळाडू कर्णधारपदाच्या वादामुळे आणि आपापसातील मतभेदांच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.
अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( ‘बीसीसीआय’ )
विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद हिरावून घेतली. ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली. त्यानंतर माध्यमांमध्ये ( Virat and Rohit ) दोघांमधील मतभेद असल्याच्या बातम्यांना उत आला. पण प्रत्यक्षात दोघा खेळाडूंनी एकमेकांविरोधात कोणताही आरोप केला नाही. उलट एकमेकांबद्दल आदरच व्यक्त केला. सध्या विराट कोहलीची जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा गेल्या 13 वर्षांपासून एकत्र खेळत आहेत. फलंदाजी करताना त्यांचा खेळपट्टीवरचा संवाद सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे. अशा दोन्ही खेळाडूंना एकमेकांबद्दलच्या इतर काही मनोरंजक गोष्टी देखील चांगल्या प्रकारे माहीत आहेत. काही वर्षांपूर्वी गौरव कपूरचा इंटरव्ह्यू शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’मध्ये विराट कोहलीने रोहित शर्माबद्दल काही मजेदार गोष्टी सांगितल्या होत्या. यापैकी एक होता रोहित शर्माचा विसरभोळेपणा…
Virat and Rohit : रोहितबाबत विराटचा खुलासा
चार वर्षांपूर्वीच्या या मुलाखतीदरम्यान विराट कोहली म्हणाला होता की, “रोहित शर्मा जितक्या गोष्टी विसरतो तितक्या गोष्टी मी कोणी विसरताना पाहिले नाही. जस की, आय-पॅड, पर्स, फोन.. यासह रोजच्या वापरातील वस्तूही विसरण्याची त्याची सवय आहे. तो वस्तू विसरतो तसेच त्याला त्याची फिकीरही नसते! तो काहीतरी विसरला आहे हेही त्याला माहिती नसतं. जेव्हा टीमची बस हॉटेलच्या अर्ध्या वाटेवर असते तेव्हा त्याला आठवते, ‘अरे मी माझा आयपॅड विमानातच विसरलो’. असा वेंधळेपणा सतत तो करत असतो.
पासपोर्टसारख्या महत्त्वाच्या गोष्टीही अनेकदा विसरला
विराटने यावेळी असे सांगितले होते की, रोहित शर्मा पासपोर्टसारख्या महत्त्वाच्या गोष्टीही अनेकदा विसरला आहे. अनेक वेळा त्याला विसरलेल्या वस्तु परत मिळवणे खूप कठीण होते. टीमचा प्रवास बसमधून सुरु होण्यापूर्वी लॉजिस्टिक मॅनेजर नेहमी विचारतात, ‘रोहित शर्माकडे त्याचे सर्व सामान आहे का?’; मग जेव्हा रोहितकडून होकार येतो, तेव्हाच बस निघते.
रोहितला खेळताना पाहणं एक खूपच आनंददायी अनुभव
दोन्ही दिग्गज खेळाडू अनेक प्रसंगी एकमेकांचे कौतुक करायला चुकले नाहीत. या मुलाखतीतही विराटने रोहितचे कौतुक करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तो म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा ज्युनिअर क्रिकेटच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण म्हणत होता की एक फलंदाज आहे जो चमकदारपणे प्रगती करतो. मला वाटायचे की मी देखील एक तरुण खेळाडू आहे, पण ते काही माझ्याबद्दल बोलायचे नाहीत. मग मला प्रश्न पडायचा की कोण आहे तो फलंदाज?”, “जेव्हा मी रोहित शर्माला एका सामन्यात फलंदाजी करताना पाहिलं, तेव्हा मी गप्प राहिलो. त्याला खेळताना पाहणं खूपच आनंददायी अनुभव असतो. खरं तर, मी त्याच्यासारखे फलंदाजीचं टायमिंग कोणाकडे पाहिलं नाही.”, असेही विराट त्यावेळी म्हणाला होता.
हेही वाचलं का?
- T Natarajan : टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज आपल्या गावात उभारतोय क्रिकेटचे मैदान
- रवींद जडेजा क्रिकेटच्या ‘या’ फॉरमॅटमधून घेणार निवृत्ती, लवकरच करणार घोषणा
- Virat Kohli : विराट कोहलीचे अनोखे ‘रेकॉर्ड’, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटर