नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क
Omicron variant updates : देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या २०० वर पोहोचली आहे. यात महाराष्ट्र आणि दिल्लीतील प्रत्येकी ५४, तेलंगणा २०, कर्नाटक १९, राजस्थान १८, केरळमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे २०० पैकी ७७ रुग्ण ओमायक्रॉन मधून बरे झाले आहेत.
दरम्यान, देशात सध्या कोरोनाचे ७९,०९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहे. ही रुग्णसंख्या ५७४ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोनामुक्ती दर ९८.४० टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांत ८,०४३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत देशातील ३ कोटी ४१ लाख ९५ हजार ६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ५,३२६ रुग्ण आढळून आले आहेत. ५८१ दिवसांतील ही सर्वांत कमी रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत देशात ६६.६१ कोटी चाचण्या झाल्या आहेत. तर लसीकरण मोहिमेत आतापर्य़ंत १३८ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
गेल्या २४ तासांत ४५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने देशातील ४ लाख ७८ हजार ७ जणांचा बळी घेतली आहे.
कोरोनाच्या 'डेल्टा' संकटातून जग पुरते सावरलेले नाही, तोच 'ओमायक्रॉन' नावाच्या व्हेरियंटने जगाची धास्ती वाढविली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम सापडलेल्या या व्हेरियंटने सध्या युरोप, अमेरिकेत खळबळ उडवली आहे. भारतातही या व्हेरियंटचे आतापर्यंत २०० रुग्ण सापडले आहेत. डेल्टा व्हेरियंटला मागे टाकण्याची क्षमता ओमायक्रॉनमध्ये असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
हे ही वाचा :