sukesh chandrashekhar case : सुकेशने कारागृहातच थाटले ऑफीस, भेटायला येत हाेत्‍या अभिनेत्री आणि मॉडेल ! | पुढारी

sukesh chandrashekhar case : सुकेशने कारागृहातच थाटले ऑफीस, भेटायला येत हाेत्‍या अभिनेत्री आणि मॉडेल !

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

२०० कोटींच्‍या मनी लाँड्रिंगप्रकरणातील सूत्रधार सुकेश चंद्रशेखर ( sukesh chandrashekhar case ) सध्‍या चर्चेत आहे तो
त्‍याचे बॉलीवूडमधील अभिनेत्री आणि मॉडेल यांच्‍याबरोबर असलेल्‍या संबंधांमुळे. सुकेश याने तिहार कारागृहातच एक अलिशान ऑफीस थाटले होते. येथे सोफा, फ्रिज, टीव्‍ही अशा सर्व सुविधा होत्‍या. कारागृहात त्‍याला भेटायला अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्‍यासह १० हूअ अधिक अभिनेत्री आणि मॉडल येत होत्‍या, असा जबाब सुकेश पत्‍नी आणि अभिनेत्री लीना मारिया पॉलने हिने सक्‍तवसुली संचालनालयाला (ईडी) दिला आहे.

२०१७मध्‍ये लाच दिल्‍याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्‍याला अटक केली. यानंतर त्‍याची रववानगी तिहार कारागृहात झाली. अण्‍णाद्रमुकचे नेते टीटीव्‍ही दिनकरण यांना निवडणूक चिन्‍ह देण्‍यासाठी त्‍याने निवडणूक आयोगाच्‍या अधिकार्‍यांना ५० कोटींचे आमिष दाखवले होते. याप्रकरणी त्‍याला अटक करण्‍यात आली.यावेळी त्‍याच्‍याकडून १ कोटी ३० लाखांची रोकड जप्‍त करण्‍यात आली होती. विशेष म्‍हणजे याप्रकरणी त्‍याची तिहार कारागृहात रवानगी करण्‍यात आली. कारागृहातूनच तो हवाला रॅकेट चालवत होता, असेही ईडीच्‍या तपासात स्‍पष्‍ट झाले होते.

sukesh chandrashekhar case : लवकरच अनेक अभिनेत्रींची नावे येणार समोर

भामटा सुकेश चंद्रशेखर यांच्‍या अनेक करामती समोर येत आहे. २०० कोटी रुपयांच्‍या मनीलॉड्रिंग तो मुख्‍य आरोपी आहे. याप्रकरणी बॉलीवूडच्‍या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही या दोघींचीही चौकशी झाली आहे. याप्रकरणी बॉलीवूडमधील आणखी काही अभिनेत्रींची नावे लवकरच समोर येतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

याप्रकरणी ‘ईडीने केलेल्‍या चौकशीवेळी सुकेशची पत्‍नी लीना हिने दिलेल्‍या माहितीतून अनेक धक्‍कादायक खुलासे झाले आहेत. ईडीच्‍या सूत्रांनी म्‍हटलं आहे की, तिहार कारागृहातच सुकेशने आपले आलीशान ऑफीस थाटले होते. येथे सोफा, फ्रिज, टीव्‍ही अशा सर्व सुविधा होत्‍या.येथेच तो पार्टी करत असे. यामध्‍ये त्‍याच्‍या महिला मैत्रीणीही सहभागी होत असत. त्‍याला भेटायला १०हून अधिक अभिनेत्री व मॉडल येत असत. पत्‍नी लीना त्‍याला तिहार कारागृहाच्‍या रजिस्‍टरमध्‍ये कोणतीही नोंद न करता थेट त्‍याला भेटायला जावू शकत होती, असेही तिने चौकशी स्‍पष्‍ट केले होते.

sukesh chandrashekhar case : अधिकार्‍यांना देत होता महिन्‍याला १ कोटी!

सुकेश चंद्रशेखर याला अटक झाली. त्‍याची रवानगी तिहार कारागृहात करण्‍यात आली. मात्र येते या भामट्याने कारगृहातील अधिकार्‍यांनाच मॅनेज केले. कारागृहातच त्‍याने अलिशान ऑफीस थाटले. ही सर्व सुविधा मिळण्‍यासाठी तो दर महिन्‍याला कारागृहारातील अधिकार्‍यांना सुमारे १ कोटी रुपये देत होता, असेही पॉल हिने आपल्‍या जबाबात सांगितल्‍याचे ईडीच्‍या सूत्रांनी म्‍हटलं आहे.

‘जॅकलिन तू हॉलीवूडची अभिनेत्री एंजेलीना जोली सारखीच आहेस’

 ‘तू हॉलीवूडची अभिनेत्री एंजेलीना जोली सारखीच आहेस. तुला घेवून मी ‘सुपरहिरो’ चित्रपटाची सीरीज करणार आहे. ५०० कोटी बजेट असणार्‍या या चित्रपटात तुझी भूमिका मुख्‍य असेल, असे आमिष सुकेशने जॅकलिनला दाखवले होते.

‘स्‍पूफ’ म्‍हणजे, फोनची रिंग वाजल्‍यानंतर फोन करणार्‍यांना खरा नंबर दिसत नाही तर अन्‍य नंबर दिसतो. जॅनलिनबरोबर मैत्री करण्‍यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या ऑफिसचा नंबरलाच सुकेशने ‘स्‍पूफ’ केला होता, असे ईडीने आपल्‍या आरोपपत्रात महटलं आहे. याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसचा जबाब दोनवेळा नोंदविण्‍यात आला आहे. चंद्रशेखर याने आपलं नाव ‘शेखर रत्‍न वेला’ असे सांगितले होते, असे जॅनलिनने ‘ईडी’ला दिलेल्‍या जबाबात म्‍हटलं होते. सुकेशला ७ ऑगस्‍ट २०२१ रोजी अटक झाली. फेब्रुवारी २०२१ ते त्‍याला अटक होईपर्यंत तो नियमित जॅकलिनच्‍या संपर्कात होता. तसेच कारागृहात असतानाही त्‍याने अभिनेत्री जॅकलिन आणिनाेरा फतेही या दाेघींना कोट्यवधी रुपयांची भेटवस्‍तु दिल्‍या होत्‍या. असेही ईडीच्‍या सूत्रांनी म्‍हटले आहे.

महाठग सुकेशला झाली होती १७ व्‍या वर्षी अटक

बेंगळूरमधील एका मध्‍यमवर्गीय घरात १९८९मध्‍ये सुकेशचा जन्‍म झाला. सुकेश चंद्रशेखर त्‍याला बालाजी नावानेही ओळखतात. त्‍याचे भांडवल काय तर? बोलण्‍यात हा प्रचंड हुशार. आपल्‍या प्रभावी बोलण्‍याने तो सर्वांनाच मोहित करायचा.
अल्‍पवयीन असल्‍यापासून त्‍याने सर्वसामान्‍य नागरिकांची फसवणुकीला सुरुवात केली. बंगळूरमधील हजारो लोकांची
त्‍याने कोट्यवधी रुपयांना फसवणूक केली होती.तर हाच प्रकार त्‍याने चेन्‍नईतही केला. त्‍याने आपल्‍या प्रभावी बोलण्‍याने अनेकांना गंडा घातला. अभिनेत्री लीना मारीया पॉल ही त्‍याच्‍या प्रेमात पडली. दोघांनी लग्‍नही केले.

शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना तो स्‍वत:ची ओळख राजकीय नेता अशी करुन देत असे. त्‍याने तामिळनाडूतील अण्‍णाद्रमुक पक्षाचे नेते टीटीव्‍ही दिनकरण यांची निवडणूक चिन्‍ह देतो, असे सांगून ५० कोटींची फसवणूक केली होती. याचप्रकरणी सध्‍या तो अटकेत आहे. मात्र कारागृहातूनच त्‍याचे सुरु असणार्‍या कारनाम्‍यांची सध्‍या जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचलं का?

पाहा व्‍हिडीओ

 

 

Back to top button