Navigation App : आता रस्ते अपघाताचे प्रमाण हाेणार कमी! केंद्राकडून ‘नेविगेशन अ‍ॅप’ लाॅन्च | पुढारी

Navigation App : आता रस्ते अपघाताचे प्रमाण हाेणार कमी! केंद्राकडून 'नेविगेशन अ‍ॅप' लाॅन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क : रस्त्यावरील लोकांची सुरक्षा वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून काही उपाययोजना राबवल्‍या जात आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या सुरक्षिततेच्या आवश्यकतेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सातत्याने सांगत आहेत. त्याचबरोबर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रायलाने देशातील ड्रायव्हर आणि रोड सेफ्टी टेक्नाॅलाॅजीसाठी आयआयटी मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia यांच्यासोबत टायप केलेले आहे. या ॲपमुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी हाेणार आहे.

तिन्ही पार्टींनी एकत्र येऊन नागरिकांसाठी एक फ्री टू यूज नेविगेशन अ‍ॅप लाॅन्च केलेले आहे. या अ‍ॅपमधून रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांच्या धोक्यांबाबत लोकांना अलर्ट केले जाईल. त्याचबरोबर या अ‍ॅपमध्ये रोड सेफ्टीचे अनेक फिचर्चदेखील देण्यात आली आहेत.

असे आहे नेविगेशन अ‍ॅप

नेविगेशन अ‍ॅप हे ड्रायव्हर्सना अपघाताची शक्यता असणाऱ्या प्रोन एरियाची, स्पीड ब्रेकरची, शार्प कर्व्स आणि खड्ड्यांसहीत इतरही धोक्यांच्या बाबतीत व्हाॅईस आणि व्हिज्युअल्स अलर्ट देते. देशातील रस्त्यांवर होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यासंबंधी रस्ते परिवहन मंत्रालयाच्या प्लॅनिंगचा हिस्सा आहे.

MapmyIndia या कंपनीने नेविगेशन अ‍ॅप तयार केलेले आहे. या अ‍ॅपला ‘MOVE’ असंही म्हंटलं जातं. या सर्व्हिसमुळे नागरिक आणि अथाॅरिटीद्वारे अपघात, असुरक्षित एरिया, रस्ते आणि ट्रॅफिक हे मुद्दे मॅपवर रिपोर्ट आणि ब्राॅडकास्ट व दुसऱ्या युजर्ससाठीदेखील मदत केली जाऊ शकते. या अ‍ॅपमधील डेटाचं विश्लेषण रोड सेफ्टी टेक्नाॅलाॅजीसाठी आयआयटी मंद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia द्वारे केले जाईल, त्यातून रस्त्यांची स्थिती सुधारण्याासठी सरकार या अ‍ॅपचा वापर करणार आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button