केरळ हादरले : २४ तासांमध्‍ये ‘एसडीपीआय’सह भाजप नेत्‍याची हत्‍या

केरळ हादरले : २४ तासांमध्‍ये ‘एसडीपीआय’सह भाजप नेत्‍याची हत्‍या
Published on
Updated on

अलप्‍पुझा : पुढारी ऑनलाईन
२४ तासांमध्‍ये दोन राजस्‍तरीय राजकीय नेत्‍यांच्‍या हत्‍या झाल्‍याने केरळ हादरले आहे. केरळमधील अलप्‍पुझा जिल्‍ह्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ('एसडीपीआय' ) अध्‍यक्ष शान केएस यांच्‍या हत्‍येनंतर अवघ्‍या काही तासांमध्‍येi भारतीय जनता पक्षाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची आज हत्‍या करण्‍यात आली. ते भाजप ओबीसी मोर्चाचे राज्‍य सचिव होते. या घटनेनंतर अलप्‍पुझा जिल्‍ह्यातील सुरक्षा व्‍यवस्‍थेत वाढ करण्‍यात आली आहे. अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. २४ तासांमध्‍ये दोन राज्‍यस्‍तरीय नेत्‍यांची हत्‍या झाल्‍याने राज्‍यात खळबळ माजली आहे.

मार्निंग वॉकला गेलेल्‍या भाजप नेत्‍याची हत्‍या

भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. ते घरी परतत असताना आठ जणांनी त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. यातील काहींनी त्‍यांना चाकूने भोसकले. हॉस्‍पिटलमध्‍ये घेवून जात असताना त्‍यांचा मृत्‍यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्‍थळी श्रीनिवासन समर्थकांची गर्दी झाल्‍याने प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता.

'एसडीपीआय' राज्‍य सचिवांना भोसकले

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ('एसडीपीआय' ) राज्‍य सचिव शान केएस ( वय ३८) यांची शनिवारी रात्री चाकूने भोसकून हत्‍या करण्‍यात आली. शान केएस हे शनिवारी सायंकाळी स्‍कुटरवरुन घरी परतत होते. कारमधून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी प्रथम त्‍यांना धडक दिली. शान हे खाली पडले. यानंतर हल्‍लेखोरांनी चाकूने भोसकून त्‍यांची हत्‍या केली.

केरळ हादरले : मुख्यमंत्र्यांनी केला तीव्र शब्‍दात निषेध

अलप्‍पुझा जिल्‍ह्यातील हिंसाचारची घटना निंदनीय आहे. कायदा हातात घेणार्‍या समाजकंटकांविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी ग्‍वाही केरळचे मुख्‍यमंत्री पिनाराई यांनी दिली.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news