पुढारी ऑनलाईन डेस्क
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि जैनेंद्र यादव यांचे निकटवर्तीय, सपा प्रवक्ते राजीव राय यांच्या घरावर आयकर विभागाच्या छाप्यानंतर अखिलेश यांनी केंद्र सरकार जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा त्यांनी आरोप केलाय. यूपी+योगी, बहुत है UPYOGI या पंतप्रधान मोदींच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांनी योगी सरकार बेकार असल्याचे म्हटले आहे.
अखिलेश यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, योगी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, आमचे फोन टॅप केले जात आहेत आणि सीएम योगी आदित्यनाथ स्वतः ते रेकॉर्डिंग ऐकत असतात, असे म्हंटले.
त्याचबरोबर केंद्र सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून धमकावण्याचे काम करत आहे. योगी हे उत्तर प्रदेशसाठी निरुपयोगी ठरले आहेत असे सांगत, सरकार टेनीला का वाचवत आहे? याचा खुलासा करण्याचे त्यांनी आव्हान दिले. राज्यात भाजपला पराभवाची भीती वाटते हे उघड उघड दिसून येतंय. त्यामुळे या सरकारकडून काय अपेक्षा करता येतील, असेही त्यांनी म्हटले.
शेतकरी, तरुण, सर्व त्रस्त
या मुख्यमंत्र्यांच्या राजवटीत ना तरुणांना रोजगार मिळतोय ना परीक्षा होत आहेत. याउलट परिक्षांचे पेपर मोठ्या प्रमाणात लीक होत आहेत. तरुण चिंतेत आहेत. सरकार शेतकऱ्यांचे ऐकत नसल्याने ते सरकारवर नाराज आहेत. या निरुपयोगी मुख्यमंत्र्यांना माहित आहे की, जनता त्यांना बाजूला सारेल. म्हणूनच ते आमच्यावर आयकर विभागाचे छापे टाकून भिती दाखवत आहेत. मात्र त्यांना आम्ही घाबरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.
हेही वाचा