Ola Electric स्कूटरची प्रतीक्षा संपली, डिलिव्हरी सुरु, जाणून घ्या किंमत

Ola Electric स्कूटरची प्रतीक्षा संपली, डिलिव्हरी सुरु, जाणून घ्या किंमत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) आपल्या ओला एस १ (Ola S1) आणि ओला एस १ प्रो (Ola S1 Pro) इलेक्ट्रिक स्कूटरची भारतात डिलिव्हरी सुरु केली आहे. चेन्नई आणि बंगळूरमध्ये एका स्पेशल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. यातून Ola S1 आणि Ola S1 Pro ची पहिल्या १०० ग्राहकांना डिलिव्हरी दिल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात ओला इलेक्ट्रिक कंपनीने ग्राहकांसाठी टेस्ट राइड उपलब्ध करुन दिली होती. इलेक्ट्रिक स्कूटरांची डिलिव्हरी ऑक्टोबरमध्ये होणार होती. पण त्याला उशीर झाला आहे. याबाबत ओला इलेक्ट्रिकचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वरुण दुबे यांनी म्हटले आहे की आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कारण आम्ही ओला एस १ ची डिलिव्हरी सुरु करत आहोत.

Ola S1 स्कूटर फुल सिंगल चार्जवर १२१ किलोमीटरपर्यंत चालवू शकता. तर S1 Pro एकावेळी चार्ज केल्यावर १८१ किलोमीटरपर्यंत धावते. S1 केवळ ३.६ सेकंदात ०-४० किेलोमीटर प्रति तास स्पीड घेते. तर एस १ प्रो ३ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रति तास वेगाने धावते.

Ola Electric : काय आहे किंमत

ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस १ ची भारतीय बाजारातील एक्स-शोरुम किंमत ९९,९९९ रुपये आहे. तर एस १ प्रो ची एक्स-शोरुम किंमत १,२९,९९९ रुपये आहे. Ola S1 मध्ये २.९८ kWh आणि S1 Pro मध्ये ३.९७ kWh बॅटरी पॅक दिले आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : 14 वर्षांच्या अथर्वचा भन्नाट डान्स व्हायरल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news