पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात सद्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकांनी पेट्रोल, डिझेल वरील गाड्या वापरण बंद केलं आहे. अनेकांनी इलेक्ट्रिक स्कूटर वापरण्यास पसंती दिली आहे. आता ऑनलाईन टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला (OLA) कंपनीने दुचाकी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत देशात इलेक्ट्रिक स्कूटर दाखल करण्याची तयारी केली आहे.
देशात पेट्रोल, डिझेलवरील वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या वाहन कंपन्याही चार चाकी कारही इलेक्ट्रिक स्वरुपात दाखल करत आहेत.
ओला (OLA) च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर ऑक्टोबर २०२१ मध्ये येणार असल्याच बोललं जात आहे. हा स्कूटर ४९९ रुपयांत नोंदणी करता येणार आहे. ही स्कूटर ८ सप्टेंबरपासून खरेदी करता येणार आहे. या स्कूटर साठी २४ तासात एक लाखाहून अधिक नोंदणी झाले आहेत. ऑक्टोंबर मध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिक स्कूटर मिळणार आहे.
ओलानं एस 1 आणि एस 1 प्रो अशा दोन स्कूटर्स ओलाने आणल्या आहेत. त्याची किंमत अनुक्रमे ९९ हजार ९९९ आणि १ लाख २९ हजार ९९९ रुपये आहे. या स्कूटरमध्ये नॉर्मल आणि स्पोर्ट असे दोन पर्याय आहेत. एस 1 ही स्कूटर एकदा चार्ज केली की १२१ किलोमीटर चालणार आहे. त्या स्कूटर चा कमाल वेग ९० किलोमीटर प्रती तास असेल. अवघ्या ३.६ सेकंदात ही स्कूटर ४० किलोमीटरचा वेग घेऊ शकते.
एस 1 प्रो ही एकदा पूर्ण चार्ज केल्यावर १८१ किलोमीटर चालेल. तिचा कमाल वेग ११५ किलोमीटर प्रती तास असेल. अवघ्या ३ सेकंदात ती ४० किलोमीटरचा वेग घेईल. यामध्ये नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर असे तीन प्रकार आहेत. या दोन्ही स्कूटर्स दहा रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटर चे तंत्रज्ञान भारतातच विकसित केले आहे. जगातील 50 टक्के इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात बनवलेल्या असाव्यात असं आपले स्वप्न असल्याचे ओलाचे अध्यक्ष भावेश अग्रवाल यांनी म्हटले आहे.