कोरोनाची तिसरी लाट कोणत्‍याही परिस्‍थितीत रोखावीच लागेल : पंतप्रधान | पुढारी

कोरोनाची तिसरी लाट कोणत्‍याही परिस्‍थितीत रोखावीच लागेल : पंतप्रधान

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन : कोरोनाची तिसरी लाट कोणत्‍याही परिस्‍थितीत रोखावीच लागेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. कोरोनाची तिसरी लाट रोखावी लागेल. त्‍याचबरोबर लहान मुलांची विशेष काळजी घ्‍यावी लागेल, असेही ते म्‍हणाले.

अधिक वाचा 

पंतप्रधानांनी आज महाराष्‍ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक , केरळ आणि ओडिशा मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. काही राज्‍यांमध्‍ये कोरोनाचे नवे रुग्‍ण वाढत आहेत, यावर पंतप्रधानांनी चिंता व्‍यक्‍त केली.

यावेळी पंतप्रधान मोदी म्‍हणाले, देशातील ८० टक्‍के नवे रुग्‍ण आणि रुग्‍णांच्‍या मृत्‍यू हे याच सहा राज्‍यांमधील आहेत. वाढणारी रुग्‍णसंख्‍या आणि मृत्‍यूसंख्‍या कमी करण्‍यासाठी विशेष प्रयत्‍नांची गरज आहे.

केंद्र सरकारने सध्‍या २३ हजार कोटी रुपयांचा राखीव निधी कोरोना प्रतिबंधासाठी ठेवण्‍यात आला आहे. याचा उपयोग आरोग्‍यसेवेसाठी करणे आवश्‍यक आहे, असेही ते म्‍हणाले.

अधिक वाचा 

संबंधित राज्‍यांनी ग्रामीण भागातील आरोग्‍य सेवेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्‍याची गरज आहे. त्‍याचबरोबर रुग्‍णालयातील बेडसंख्‍याही वाढवावी लागणार आहे, असेही ते म्‍हणाले.

कोरोना रुग्‍णसंख्‍येबाबत पारदर्शकता आणण्‍याची गरज

राज्‍य सरकारने कोरोना रुग्‍णसंख्‍येबाबत पारदर्शकता आणण्‍याची गरज आहे. कोरोनाची परिस्‍थिती आटोक्‍यात आली नाही तर गंभीर परिणार होतील, असा इशारा आरोग्‍य क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी दिला आहे.

त्‍यामुळे तिसरी लाट येण्‍यापूर्वी आपल्‍याला कोरोनाचा प्रतिबंध करावा लागणार आहे, असेही पंतप्रधान म्‍हणाले.

 वाढती रुग्‍णसंख्‍या चिंतेची बाब

काही राज्‍यांमध्‍य अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र येथे कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे.

कोरोनाची वाढती रुग्‍णसंख्‍या आटोक्‍यात ठेवण्‍यासाठी उपाययोजानांची अंमलबजावणी करण्‍याची गरज आहे, असेही ते म्‍हणाले.

नागरिकांमध्‍ये जागृकता निर्माण करण्‍यासाठी राजकीय पक्षांबरोबरच स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेण्‍याची गरज आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

कोरोना रुग्‍णसंख्‍या कमी करण्‍यासाठी आता मायक्रो कंटेंमेंट झोनवर अधिक लक्ष द्‍यावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

हेही वाचल का?

Back to top button