Rohit vs Virat : रोहित शर्मा कॅप्टन होताच विराटच्या ‘या’ आवडत्या खेळाडूंचे करिअर धोक्यात!

Rohit vs Virat : रोहित शर्मा कॅप्टन होताच विराटच्या ‘या’ आवडत्या खेळाडूंचे करिअर धोक्यात!

पुढारी ऑनलाईन डेस्क; बीसीसीआयने विराट कोहलीला (Rohit vs Virat) मोठा धक्का देत त्याची वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटवले आहे. त्याच्या जागी टीम इंडियाला नवा कर्णधार नेमण्यात आला आहे. आता रोहित शर्मा (rohit sharma) हा टीम इंडियाचा नवा कर्णधार असेल. त्यामुळे द. आफ्रिका दौ-यातील वनडे मालिकेसाठी रोहितच्या नेतृत्वाखाली विराट कोहली (virat kohli) कसे प्रदर्शन करेल याची उत्सुकता सर्व क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

विराट कोहलीने यापूर्वी विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० चे कर्णधार पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर रोहित शर्माला टी-२० संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडचा दारुण पराभव करत टी २० मालिका खिशात घातली. आता रोहितकडे वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून द. आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून तो आपला पदभार स्वीकारेल. (Rohit vs Virat)

दुसरीकडे विराट कोहली केवळ कसोटी सामन्यातच कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. रोहितला वनडेचा कर्णधार बनवल्यानंतर अनेक खेळाडूंचे करिअर धोक्यात आल्याची चर्चा आहे. जेव्हा नवीन कर्णधार संघात येतो, तेव्हा प्रत्येक कर्णधाराला आपल्या गोटातील खेळाडूंना संधी द्यायची असते असे अनेक वेळा बोलले जाते. विराट कर्णधार असताना तोही असंच करतो असे अनेकांनी आरोपही केले. काही खेळाडू तर विराटसाठी खूप खास असल्याची चर्चा व्हायची. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराटच्या 'त्या' खास आवडत्या खेळाडूंना संघात स्थान मिळेल का? असा प्रश्न अनेक दिग्गज उपस्थित करत असल्याचे समजते आहे. (Rohit vs Virat)

विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला वनडे संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर विराटच्या चाहत्यांची नक्कीच निराशा होणार आहे. पण दोघेही टीम इंडियाचे स्टार फलंदाज आहेत. आता विराटचे आवडते खेळाडू मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना रोहित संघात स्थान देईल का? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)

भारतीय संघाचा उगवता वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूंमध्ये गणला जातो. मोहम्मद सिराज स्विंग बॉलिंगमध्ये निपुण आहे. सिराजने न्यूझीलंडविरुद्ध दमदार कामगिरी करत कसोटी संघात आपले स्थान पक्के केले. मुंबई कसोटीत त्याने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात तीन फलंदाजांना झटपट बाद करून त्यांचे कंबरडे मोडले होते. कर्णधार झाल्यानंतर रोहित त्याच्यावर विश्वास ठेवणार का? याची उत्सुकता लागली आहे.

वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)

वॉशिंग्टन सुंदर आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. तो विराट कोहलीच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. कोहली आपल्या कर्णधारपदाखाली फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला पसंती द्यायचा. वॉशिंग्टन सुंदर २६ टी-२०, १ एकदिवसीय आणि ४ कसोटी सामने खेळला आहे. आता रोहित शर्मा कर्णधार बनल्यानंतर त्याची कारकीर्दही धोक्यात आल्याचे जाणकार बोलत आहेत. बघूया रोहित शर्माला कोणत्या फिरकी गोलंदाजासोबत खेळायला आवडेल.

युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

रोहितच्या नेतृत्वाखाली कुलदीप आणि चहलची जोडी तुटली तर संघात फक्त कुलदीपच दिसेल. कारण रोहितचा चहलपेक्षा कुलदीपच्या फिरकीवर जास्त विश्वास आहे. युझवेंद्र चहलही आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो. चहलची गणना विराटच्या खास खेळाडूंमध्ये केली जाते. आगामी काळात रोहित टीम इंडियात कोणाला संधी देऊ शकतो, ते पाहणे बाकी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news