पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशात शब्दश: हिऱ्यांची खाण Panna Diamond Mining असलेल्या पन्ना शहरातील नऊ मजुरांना तब्बल १०. ६९ कॅरेटचा हिरा मिळाल्याने त्यांचे नशीब खुलले आहे. हे शहर आणि त्याभोवतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हिरे मिळतात. हिरे व्यापाऱ्यातील तज्ज्ञांनुसार या हिऱ्यांची किंमत पाच लाख रुपये प्रतिकॅरेट असून हा हिरा सुमारे ५० लाख रुपये किमतीचा असल्याचे बोलले जात आहे.
पन्ना शहरासह अनेक ठिकाणी शेतांमध्ये हिरे मिळतात. संबधित मजुरांना मिळालेला हिरा लिलावासाठी ठेवण्यात आला आहे. आनंदीलाल कुशवाहा आणि त्यांच्या आठ साथीदारांना राजेश यादव यांच्या जमिनीत हा हिरा मिळाला.
हिरा अधिकारी आर. के. पांडे म्हणाले,' हा हिरा रानीपूर येथील आनंदीलाल यांना मिळाला आहे. याची क्वालिटी अतिशय चांगली आहे.'
पन्ना शहराजवळील मझगवां येथे मोठे वाघांचे अभयारण्य आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात हिरे मिळतात. येथील खाणकामावर बंदी घालण्यात आली होती. यातून मिळणारे उत्पन्न आणि रोजगार यामुळे होणारी उलाढाल पाच कोटी रुपयांची आहे.
पन्ना जिल्ह्यातील मझगवां ही अशी एकमेव देशातील मॅकनाइज्ड हिऱ्यांची खाण Panna Diamond Mining आहे. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (एनएमडीसी) ने जिल्ह्यातील अन्य काही खासगी ठिकाणी आठ बाय आठ फुटांचे ७०० प्लॉट भाड्याने दिले आहेत. या छोट्या खाणींमध्ये जवळपास सह ते सात हजार कामगार काम करतात. मात्र, हा परिसर अभयारण्यासाठी आरक्षित असल्याने तेथे खाणकाम करण्यास विरोध केला आहे.
त्यामुळे आपल्याच खाणी बंद करण्याची वेळ एनएमडीसीवर आली आहे. लोक आता स्वत:च्या जमिनीत खोदकाम करून हिरे शोधतात.
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या माहितीनुसार देशात मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आरि छत्तीसगढ हे हिऱ्यांचे भांडार आहे. यापैकी ९० टक्के हिरे हे मध्य प्रदेशात मिळतात. पन्नाजवळील मझगवां खाणीत वर्षभरात ८४,००० कॅरेटचे हिरे मिळतात. या परिसरातून आत्तापर्यंत जवळपास १०, ०५, ०६४ कॅरेटचे हिरे काढले गेले आहेत. या खाणीतील प्रतिटन १०० टन मातीतून १० कॅरेट हिरे मिळतात.
एनएमडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या परिसरात अजून एक हजार कोटी रुपये किंमतीचे ८. ४७ लाख कॅरेटचे हिऱ्यांचे भांडार आहे. मात्र, येथे अभयारण्य झाल्याने या हिऱ्यांच्या शोध घेण्यात अडचणी येत आहेत. हे खाणकाम अनिश्चित काळासाठी बंद ठेवले तर हे हिरे सुरक्षित राहतील की नाही सांगता येत नाही.
हेही वाचा :