न्यूयॉर्क ; पुढारी ऑनलाईन डेस्क
हो तुम्ही वाचलेला मथळा वास्तव आहे. एका कंपनीच्या प्रमुखाने एक झूम मीटिंग घेतली . यावेळी त्याने एक नव्हे दोन नव्हे तब्बल ९०० लोकांना कायमचं घरी बसवलं. या घटनेमुळ कंपनीचा प्रमुख सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. तितकीच त्याच्यावर टीका देखील हाेत आहे. या झूम मीटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला आणि काही तासातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तुम्ही जर या झूम कॉलचा भाग असाल तर तुम्ही त्या दुर्देवी लोकांपैकी एक आहात ज्यांना कामावरून कमी केलं जात आहे, असं बेटर. कॉम या मॉर्गेज फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग यांनी म्हटल आहे.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयावर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मीटिंगमध्ये असं घडू नये असं मला वाटत होतं, अस बारीक आवाजात ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी काही नोट्स आपल्या हातात घेतल्या.
उत्पादकता, मार्केटमधील बदल, कंपनीतील कर्मचाऱ्यांची कामगिरी यामुळे बेटर. डॉट कॉम कंपनीला १५ टक्के कर्मचाऱ्यांना कमी करावं लागत आहे. ताळेबंद चोख असणं, लक्ष केंद्रित कर्मचारी पटावर असणं हे कंपनीच्या वाटचालीसाठी आवश्यक होतं, असं त्यांनी सांगितलं.
या झूम मीटिंगनंतर गर्ग यांनी एक निनावी ब्लॉगपोस्ट लिहिल्याचं फॉर्च्युन मासिकाने म्हटलं आहे.
कामावरुन काढून टाकण्यात आलेले कर्मचारी हे आपल्या कामाप्रती निष्ठावान नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळं ग्राहक अन्य कंपन्यांकडे वळले. आठ तासातील काही तासच हे कर्मचारी काम करत होते, उरलेल्या वेळेत काम करत असल्याचा दिखावा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घरखरेदी प्रक्रिया तंत्राज्ञानाच्या साह्याने अधिक वेगवान आणि सुलभ करण्याचा बेटर. डॉट कॉमचा उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?