नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या सम्यक विकासासाठी आरोग्य, शिक्षण, कृषी, कौशल्य, निर्माण तसेच व्यापारासह इतर क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) शक्यतांचा शोध घेतला पाहिजे. असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी केले.
एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांच्या तक्रारीकरिता संरक्षण विभाग, प्रशासकीय सुधारणा तसेच नागरी तक्रार विभाग आणि आयआयटी कानपूरच्या संयुक्त प्रयत्नांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर आधारीत तक्रार निवारण अप्लिकेशनच्या उद्धाटन केले.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) गेल्या काही काळात बरेच काम केले आहे. संघटनेने लष्कराच्या उपयोगात येणारे रोबोट, नेत्रा सारखे अप्लिकेशन, छातीच्या एक्सरेतून कोरोनाचे निदान करण्यारे 'आत्मन एआय' सारखे उपकरणे विकसित केले आहेत.
जग वेगाने विज्ञान तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात मार्गक्रम करीत आहे. प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलीजन्सचा उपयोग केला जात आहे. संरक्षण मंत्रालय यात अनेक पातळीवर पुढे आहे. नागरिकांच्या तक्रारीकरिता त्यामुळे या अप्लिकेशनची सुरूवात करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.